शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

सूूरजमल जैन बनले धर्मगुप्तजी महाराज

By admin | Updated: October 15, 2016 01:20 IST

औरंगाबाद : आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित दीक्षा सोहळ्यात राजस्थान येथील ब्रह्मचारी सूरजमल जैन यांनी जैनेश्वरी दीक्षा घेतली.

औरंगाबाद : आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित दीक्षा सोहळ्यात राजस्थान येथील ब्रह्मचारी सूरजमल जैन यांनी जैनेश्वरी दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे नामकरण धर्मगुप्तजी महाराज असे करण्यात आले. हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल महाविद्यालय प्रांगणात दीक्षा सोहळ्याला सकाळी सुरुवात झाली. प्रथम सूरजमल जैन यांचा केसलोच विधी पार पडला. आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी त्यांच्यावर जैनेश्वरी दीक्षाचे संस्कार केले. त्यानंतर त्यांचे क्षुल्लक धर्मगुप्तजी महाराज असे नामकरण करण्यात आले. यावेळी मुनीश्री सुयशगुप्तीजी, मुनीश्री चंद्रगुप्तजी, आर्यिका कुलभूषणमती माताजी, आर्यिका सुनितीमती माताजी, आर्यिका सुनिधीमती माताजी, आर्यिका विनम्रमती माताजी यांची प्रमुख उपस्थिती होती. आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी यावेळी जैन धर्मामध्ये जैनेश्वरी दीक्षाचे महत्त्व विशद केले. हा सोहळा पाहण्यासाठी राजस्थानातील लोहारिया येथील शेकडो भाविक आले होते. हजारो भाविकांनी दीक्षा घेणाऱ्यांचा जयजयकार केला. क्षुल्लक धर्मगुप्तजी महाराज यांना पिच्छी देण्याचा मान कान्हादेवी जैन, प्रदीप जैन यांना मिळाला. शास्त्राचा मान रतिलाल जैन यांना मिळाला. कमंडलूचा मान मनोज कोठारी यांना मिळाला. दीक्षा महोत्सवात राजस्थान, भिलवाडा, मुंबई, नाशिक, नांदगाव, आडूळ, पाचोड, कन्नड, वैजापूर, देवगाव रंगारी, चापानेर तसेच शहरातील हजारो भाविक सहभागी झाले होते.दीक्षा सोहळा यशस्वीतेसाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर विश्वस्त व कार्यकारिणी मंडळ, चातुर्मास समिती व तीस चौबीस विधान समिती, कुंथुनाथ युवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.