शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षण समितीचा मोर्चा

By admin | Updated: August 9, 2014 00:32 IST

अंबाजोगाई : धनगर समाजाचा समावेश एस. टी. प्रवर्गात करून या प्रवर्गाच्या सवलती धनगर समाजाला द्याव्यात. या मागणीसाठी अंबाजोगाईत

अंबाजोगाई : धनगर समाजाचा समावेश एस. टी. प्रवर्गात करून या प्रवर्गाच्या सवलती धनगर समाजाला द्याव्यात. या मागणीसाठी अंबाजोगाईत धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सकाळी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. पारंपारिक वाद्यासह निघालेल्या या मोर्चात महिला व विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. मोर्चेकऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने अंबाजोगाई शहर दणाणून गेले. भारतीय राज्य घटनेत ‘धनगड’ या नावाने अनुसूचित जमातीच्या या यादीत ३६ व्या क्रमाकांवर नोंद असलेल्या धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाच्या सवलतीचा लाभ मिळावा. स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे लोटले तरी या चुकीची दुरूस्ती अद्याप झाली नाही. परिणामी याचा मोठा फटका धनगर समाजाला सहन करावा लागत आहे. या संदर्भात केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धनगर समाज उपेक्षित राहिला आहे. या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सकाळी भव्य मोर्चा येथील डॉ. आंबेडकर चौकातून निघाला. पारंपरिक वाद्ये, जोरदार घोषणाबाजी,यांच्यासह मोर्चात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांसह महिला व विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. हा मोर्चा बसस्थानक, शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. य्यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत मान्यवरांची भाषणे झाली. या मोर्चात प्रा. महेश चौरे, वसंत शिंपले, नितीन काळे, सुखदेव देवकते, प्रा. विष्णु कावळे, भाऊराव गवळी, अशोक हेडे, जयराम लगसकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. आंदोलनाने शहर दणाणून गेले़ महिलांचाही मोठा सहभाग होता़(वार्ताहर)