शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा जोरदार मोर्चा

By admin | Updated: August 9, 2014 00:26 IST

धनगर समाज आरक्षण कृृती समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

जालना: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा त्याद्वारे आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृृती समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता गांधी चमन भागातून हा मोर्चा निघाला. ‘यळकोट यळकोट जय मल्हार, उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो’ अशा गणगनभेदी घोषनांनी शहर दणाणले.एका शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. धनगर समाजास घटनेनेच अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले आहे. मात्र केवळ धनगर आणि धनगड या र आणि ड च्या घोळामुळे मागील ६७ वर्षापासून समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित मत व्यक्त करण्यात आले. घटनेने दिलेल्या अधिकारा प्रमाणे समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, राज्य शासनाने या बाबत आपला अहवाल केंद्र सरकारला पाठवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलनास शिवसेना, भाजप, मनसे, भारीप बहुजन महासंघ आदी विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबर दिला. मोर्चात कृतिसमितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक तारडे, डॉ.एल. डी. भोजने, प्रकाश इंगळे, अ‍ॅड. सुरेश देशमुख, नारायण चाळगे, दिनकर देशमुख, सुभाष देंडगे, प्रा. माळशिखरे, देविदास कटके, अ‍ॅड. झेड. बी. मिसाळ, पांडुरंग कोल्हे, डॉ. बळीराम गायकवाड, शिवप्रकाश चितळकर, ओमप्रकाश चितळकर, शांतीलाल बनसोडे, राम लांडे, कैलास खडेकर, गजानन जोशी, रामेश्वर मैंद, दामु जोशी, ज्ञानेश्वर हांडगे, निवृत्ती सातपूते, संतोष सोलाट, किसन मैद, सुभाष सोलाट, रामदास जोशी, बाबासाहेब आटोळे, पांडुरंग कावळे, दिवटे, शोभाताई मतकर, अ‍ॅड. सुरेश मतकर, शोभा मतकर, राजेंद्र वैद्य, सुरेश दिवटे, रामेश्वर जऱ्हाड, संतोष खडेकर, गजानन आधे, ऋषि आधे, संतोष काळे, आसाराम मिसाळ, अशोक विर, महेंद्र भाकरे, रामेश्वर आधे, गणेश रौदाळे, दत्ता चोरमारे, कैलास चोरमारे, रंगनाथ देवकाते, बाळासाहेब हाके, कैलास कोळेकर, सर्जेराव सरोदे, विशाल पांढरे, मापारी, अ‍ॅड. वैभव खटके, अ‍ॅड. भगवान वीर, निलेश रौदाळे, अशोक रौदाळे, गणेश रौदाळे, किसन वीर, चत्रभूज शेळके, रोहिदास शेळके, मच्छिद्र वीर, रावन दहेकर, दत्तात्र्य रौदाळे, दत्तात्रय डोळझाके, यांच्यासह सुमारे २५ ते ३० हजार समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. (प्रतिनिधी)