उदगीर : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्ष घातलेल्या कुमठा ग्रामपंचायतीत त्यांच्या समर्थकांच्या पॅनलचा सफाया झाला़ येथे पुन्हा माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी आपलेच वर्चस्व असल्याचे निकालातून दाखवून दिले़उदगीर तालुक्यातील कुमठा ग्रामपंचायतीत प्रथमच बिनविरोध परंपरा खंडीत होऊन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे समर्थक सुनिल केंद्रे यांनी आपले पॅनल उभे केले होते़ त्यांना बळ देण्यासाठी दस्तुरखुद्द धनंजय मुंडे यांनी कुमठ्यात येऊन सभा घेतली होती़ त्याचा परिणाम जाणवेल, अशी नागरिकांत चर्चा होती. मात्र गुरुवारी जाहीर झालेल्या निकालातून मुंडे समर्थकांचे पॅनल पराभूत झाले़ सर्वच ११ जागांवर माजी आमदार गोविंद केंद्रे यांच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळविला़ दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभेनंतर गावात मतदानालाच जाणार, असे सांगणाऱ्या गोविंद केंद्रे यांनी तीन दिवस अगोदरपासूनच तळ ठोकून आपले तळे राखले़ यासाठी त्यांचे बंधू शिवाजीराव केंद्रे यांनीही शर्थीचे प्रयत्न केले़ या निकालानंतर प्रतिक्रिया देताना माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी ‘सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही़़़’ इतक्याच शब्दात आपल्या भावना सांगितल्या़ (वार्ताहर)
धनंजय मुंडे येऊनही कुमठ्यात गोविंद केंद्रेंच्या पॅनलची बाजी
By admin | Updated: April 24, 2015 00:38 IST