शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दहा देशांतील बौद्ध भिक्खू येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:37 IST

बुद्धलेणीच्या पायथ्याशी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास दहा देशांतील बौद्ध भिक्खू उपस्थित राहतील

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बुद्धलेणीच्या पायथ्याशी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास दहा देशांतील बौद्ध भिक्खू उपस्थित राहतील, अशी माहिती भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.या ठिकाणी दरवर्षी अशोक विजयादशमीनिमित्त दहा दिवस श्रामणेर शिबीर आणि दहाव्या दिवशी मोठा समारंभ आयोजित केला जातो. या पार्श्वभूमीवर येथे पिण्याचे पाणी, पथदिवे, स्वच्छतागृह आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी अनेकदा महापालिकेकडे मागणी केली; परंतु महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले, अशी खंत भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरालगत बुद्धलेणीच्या पायथ्याशी प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्र आहे. या केंद्रामध्ये अनेक कुटींमध्ये बौद्ध भिक्खू निवास करतात. येथे मोठे विपश्यना केंद्रही आहे. याठिकाणी रोज मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यांतून हजारो उपासक- उपासिका भेट देत असतात. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथे सलग दहा दिवस श्रामणेर शिबीर घेण्यात येते. शिबिरात यंदा ६० जणांना श्रामणेर दीक्षा देण्यात आली असून, त्यांना रोज ध्यान साधना, बौद्ध धम्माच्या संस्कृतीची शिकवण दिली जाते. यंदा याठिकाणी अशोक विजयादशमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता कोलकाता आणि अहमदनगर येथील १२ कुटुंबांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली जाणार आहे. या परिस्थितीत येथे पायभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. यासाठी मनपा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.