शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शाडूच्या गणेशमूर्तींना भक्तांची सर्वाधिक पसंती

By admin | Updated: August 29, 2014 01:31 IST

औरंगाबाद : गणेशोत्सवाचे स्वागत जोरदार केले जात असताना काळानुरूप त्याच्या स्वरूपात बदल झाले पाहिजेत, अशी समस्त गणेशभक्तांची केवळ मागणीच आहे असे नाही;

औरंगाबाद : गणेशोत्सवाचे स्वागत जोरदार केले जात असताना काळानुरूप त्याच्या स्वरूपात बदल झाले पाहिजेत, अशी समस्त गणेशभक्तांची केवळ मागणीच आहे असे नाही; तर हे बदल कसे करता येतील हेही त्यांनी सांगितले आहे.२९ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या ११ दिवसांच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने १७ ते ६५ वर्षे वयापर्यंतच्या ६५ स्त्री-पुरुषांना प्रश्नावली दिली होती. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, घरकाम, गृहिणी अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे गणेशभक्त जागरूक नागरिक असल्याचे या पाहणीतून समोर आले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने सर्वाधिक पसंती शाडूच्या गणेशमूर्तींना मिळाली आहे. गणेशोत्सवात आवाजाचा त्रास खूप होतो, अशी सार्वत्रिक तक्रार असली तरी या पाहणीत भक्तांनी मंडळाच्या ठिकाणी लाऊडस्पीकर असावा, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ६५ पैकी ४१ जणांना लाऊडस्पीकर असावा असे वाटते. उत्सवाचे १० दिवस गणपतीच्या मूर्ती बघायला येणाऱ्या भक्तांना चित्रपटांतील गाणी ऐकायला काही प्रमाणात आवडते. मात्र, या उत्सवात चित्रपटगीते वाजवूच नयेत, असेही तेवढ्याच भक्तांना वाटते.उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण सगळ्यांनाच असते. त्या दिवशी जवळपास सुटीही असते. त्यामुळे आबालवृद्धांमध्ये मिरवणुकीचा उत्साह असतो. विसर्जन मिरवणूक पुणे शहरात २४-३० तास चालते. औरंगाबादेतही ही मिरवणूक किती चालावी, हे सांगताना नागरिकांनी १२ तासांना सर्वाधिक पसंती दिली. कार्यकर्त्यांनी धांगडधिंगा करू नये. त्यामुळे मंडळाची व उत्सवाची प्रतिमा मलिन होते.४इतरांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने उत्सव साजरा करावा.४उत्सवाच्या मूळ धार्मिक परंपरा जपाव्यात.४सांस्कृतिक कार्यक्रम करावेत.४समाजोपयोगी उपक्रमांनाही प्राधान्य असावे.४दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनुत्पादक खर्च कमी करून तो पैसा सरकारला द्यावा.