अंबाजोगाई/परळी/गेवराई/ माजलगाव: अंबाजोगाई, परळीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या विठ्ठल-रुखमाईच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या.वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी अलोट गर्दी केली होती. समाधी परिसरात एकादशीच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाधीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले. मुकुंदराज संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. माधवबुवा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. गेवराई तालुक्यातील ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.गंगामसला येथील अजित नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुखमाईची वेशभूषा करुन दिंडी काढली.हजारो भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शनबारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीच्या वैद्यनाथ मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळली
By admin | Updated: July 10, 2014 00:56 IST