शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भाविक परतीच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कार्तिकी पौर्णिमेनिमित्त बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे तीन दिवस मोठी यात्रा भरते. येथील संत ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कार्तिकी पौर्णिमेनिमित्त बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे तीन दिवस मोठी यात्रा भरते. येथील संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लाखो भाविक कपीलधारमध्ये दिंड्यांसह दाखल झाले होते. शुक्रवारी महापूजेनिमित्त श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात भक्तीचा महापूर होता. दरम्यान, शनिवारी सर्व भाविक समाधीचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या दिशेने निघाले होते. यावेळी ‘हर हर महादेव.., गुरुराज माऊली, मन्मथ माऊली’चा जयघोष कानी पडत होता.श्रीक्षेत्र कपिलधार येथे प्रत्येक वर्षी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त तीन दिवस यात्रा भरत असते. राज्यासह परराज्यातील जवळपास ६५ पेक्षा जास्त दिंड्यासह वाहनांमधून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांचे हाल होणार नाहीत, यासाठी संस्थानच्या वतीने पूर्ण नियोजन केले जाते. यावर्षीही संस्थानकडून सुरळीत आणि लवकर दर्शन व्हावे, यासाठी नियोजन केल्याचे दिसून आले. शुक्रवारी शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिंडीचे आगमन झाले. त्यानंतर रात्री दहा ते १२ या वेळेत धर्मसभा झाली. यावेळी शिवाचार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.दरम्यान, शुक्रवारी जवळपास ५० च्यावर दिंड्या कपीलधारमध्ये आल्या होत्या. शनिवारी चितळी पुतळी, हातगाव, जिंतूर इ. ठिकाणच्या दिंड्या कपिलधारमध्ये आल्या. दर्शन, महाप्रसाद घेतल्यानंतर त्या सायंकाळी परतीच्या दिशेने निघाल्या होत्या. ठिकठिकाणी भाविकांच्या नाश्ता व चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तीन दिवस चाललेला हा यात्रोत्सव शांततेत पार पडला.तीन संशयित ताब्यातगर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात कारवाईही केल्याचे बल्लाळ म्हणाले.