नांदेड: येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर आज सायंकाळी ६़३० वाजेच्या सुमारास पोहोचलेल्या सिकंदराबाद - मुंबई देवगिरी एक्सप्रेसमध्ये एका महिलेचा मृत्यु झाल्याने गाडी एक तास स्थानकावर थांबविण्यात आली़ सदरील महिला तिच्या पतीसोबत मुंबई येथे जाण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्थानकाहून तिच्या पतीसोबत गाडीमध्ये बसली होती़ मृत महिला शिरशिला जि़ करीमनगर येथील असून नांदेडजवळ गाडी आल्यानंतर सदरील महिलेचा मृत्यू झाला़ परंतू मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही, अशी माहिती तपासिक अमलदार राठोड यांनी दिली़ पत्नीचा मृत्यू झाल्याने तिच्या पतीचीही प्रकृती खालावली आहे़ (प्रतिनिधी)
देवगिरी एक्सप्रेस तासभर थांबविली
By admin | Updated: August 24, 2014 01:15 IST