शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्याचीच ‘हत्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:01 IST

औपचारिकता म्हणून आराखडे मंजूर करून ठेवण्यात येतात, अशा शब्दांत शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकांच्या कारभाराचे वाभाडे काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकांसाठी शहर विकास आराखडा आत्मा आहे. एखाद्या धर्मासाठी त्यांचा धर्मग्रंथ जसा मार्गदर्शक असतो तसेच महापालिकांसाठी विकास आराखडा आहे. याची किंचितही अंमलबजावणी होत नाही. औपचारिकता म्हणून आराखडे मंजूर करून ठेवण्यात येतात, अशा शब्दांत शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकांच्या कारभाराचे वाभाडे काढले. औरंगाबादेत मागील पाच दशकांमध्ये दोन विकास आराखडे मंजूर झाले. या आराखड्यांची ‘हत्या’ करण्याचे पापही सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या पदाधिकाºयांकडूनच झाले, हेविशेष.इतिहासाचा वारसा लाभलेल्या औरंगाबाद शहरात सर्वात प्रथम म्हणजेच १९७२ मध्ये शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. जुन्या शहराशी निगडित हा आराखडा होता. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने शासनाने १९८२ मध्ये नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत केले. याच दरम्यान, शहराच्या आजूबाजूच्या १८ खेड्यांचा मनपात समावेश करण्यात आला. मनपाने नवीन औरंगाबाद शहर डोळ्यासमोर ठेवून १९८६-८७ मध्ये एक नवीन विकास आराखडा तयार केला. त्याला १९९१ मध्ये मंजुरी मिळाली. या आराखड्याची मुदत २०११ मध्ये संपली. आराखड्याची अंमलबजावणी १० टक्केही झाली नाही. २०११ पासून नवीन विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाने नगररचना विभागातील तज्ज्ञ अधिकाºयांचे एक पथक या कामासाठी नेमले. या पथकावर तब्बल दीड कोटी रुपये मनपाकडून खर्च करण्यात आला. २०१५ मध्ये आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले. ३० आॅक्टोबर रोजी मनपा आयुक्तांकडे आराखडा सोपविण्यात आला.शासनाने सादर केलेला आराखडा जनतेसमोर प्रसिद्ध करण्यात आला नाही. त्यामध्ये प्रचंड फेरफार करून नागरिकांसमोर ४ फेबु्रवारी २०१६ मध्ये मांडण्यात आला. या चुकीच्या आराखड्याला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. खंडपीठाने संपूर्ण प्रक्रिया रद्द ठरवून नव्याने आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.खंडपीठाच्या निर्णयाला सध्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सोमवार, ११ सप्टेंबर रोजी याची सुनावणी होणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर मनपाने आतापर्यंत १ कोटी रुपये खर्च केले आहेत, हे विशेष. मनपा सर्वसाधारण सभेत विकास आराखड्याचीहत्या करण्याचे काम मागील वर्षी सत्ताधारी शिवसेना-भाजपकडूनच झाले.