शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या घटकापर्यंतचा विकास हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:53 IST

समाजातील दुरावा कमी करण्यासाठी सुशिक्षितांनी मागासलेल्या समाज घटकांत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करावी. वाढता अत्याचार रोखण्यासाठी आता अन्यायाविरुद्ध चर्मकार उठाव संघातर्फे काम करण्याचा निर्धार दुसºया अधिवेशनात करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समाजातील दुरावा कमी करण्यासाठी सुशिक्षितांनी मागासलेल्या समाज घटकांत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करावी. वाढता अत्याचार रोखण्यासाठी आता अन्यायाविरुद्ध चर्मकार उठाव संघातर्फे काम करण्याचा निर्धार दुसºया अधिवेशनात करण्यात आला आहे.संत तुकाराम नाट्यमंदिरात महापौर भगवान घडमोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच संत रविदास, फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी माजी मंत्री तथा आ. संजय सावकारे, माजी आ. बाबूराव माने, लहू कानडे, अप्पर आयुक्त विजयकुमार फड, अंकुश कानडे, मनाली गवळी, रविकिरण घोलप, प्रदेश सरचिटणीस मोतीलाल आहिरे, अशोक आम्ले, स्वागताध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आदींची उपस्थिती होती.समाजात विषमता वाढू देऊ नका, कष्टाने व शिक्षणाने ऐश्वर्य मिळविले असले तरी समाजाच्या शेवटच्या घटकाकडेही वळून पाहिले पाहिजे. समाजाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा, असेही आ. संजय सावकारे म्हणाले. शैक्षणिक प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यास समाजानेही हातभार लावला पाहिजे. शासनाकडून मोठे वसतिगृह उभारण्यात येत आहे, असे सावकारे म्हणाले.उद्योगवाढीवर लक्ष द्या...समाजातील युवकांच्या शैक्षणिक, रोजगारवाढीसाठी पहिले लक्ष द्यावे, विषमता दूर झाली तर समाजाला विकासाच्या वाटा सापडतात. एकात्मतेचा लढा यश मिळवून देतो हे निश्चित मानावे लागेल, असे महापौर घडमोडे यांनी सांगितले. अप्पर आयुक्त विजयकुमार फड यांनी दोहा सादर केला तर ग्रामीण उपाधीक्षक अशोक आम्ले मतभेद टाळून प्रगती साधण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असा सल्ला दिला.