शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शहर विकासाला हवे अर्थक्रांतीचे चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:33 IST

नवनिर्वाचित महापौरांनी येणा-या अडीच वर्षांमध्ये पन्नासपेक्षा अधिक लहान-मोठे प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. खरोखरच शहर ‘स्मार्ट’बनवायचे असेल, तर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे लागेल. त्यासाठी काही कठोर आणि कटू निर्णय घ्यावे लागतील.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेचा कारभार मागील काही महिन्यांपासून निव्वळ जीएसटी अनुदानावर सुरू आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना आदी उत्पन्नाच्या आर्थिक स्रोताचा मनपाने अक्षरश: गळा घोटला आहे. तिजोरीत पैसेच नसतील, तर शहराचा विकास करणार कसा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नवनिर्वाचित महापौरांनी येणा-या अडीच वर्षांमध्ये पन्नासपेक्षा अधिक लहान-मोठे प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. खरोखरच शहर ‘स्मार्ट’बनवायचे असेल, तर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे लागेल. त्यासाठी काही कठोर आणि कटू निर्णय घ्यावे लागतील. आजपर्यंत प्रशासन आणि पदाधिका-यांनी ‘जुमलों की बारिश’अनेकदा केली आहे. यापुढे औरंगाबादकरांना फक्त कृती हवी आहे.महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी ५५० कोटी रुपये येतात. त्यातील २२५ कोटी रुपये निव्वळ पगारावर खर्च होतात. पाणीपुरवठा, कचरा उचलणे, विजेचे बिल या अत्यावश्यक खर्चावर सुमारे १०० कोटी रुपये खर्च होतात. मागील काही वर्षांमध्ये बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते, पथदिवे, डागडुजी, प्राणिसंग्रहालय, वाहनांचा खर्च, विविध कल्याणकारी योजना राबविणे आदी कामांवर किमान ३० कोटी रुपये खर्च होतात. शहरातील १५ लाख नागरिकांसाठी विकासकामे करण्यासाठी ७० ते ८० कोटी रुपयेच शिल्लक राहतात. दरवर्षी महापालिका अर्थसंकल्प तयार करते. हा अर्थसंकल्प कोटींची उड्डाणे घेणारा असतो. वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प कधीच तयार करण्यात आला नाही. यंदाही १२०० कोटींचा अर्थसंकल्प तयार करून ठेवला आहे. वर्षअखेरीस तिजोरीत ५५० कोटींपेक्षा अधिक रक्कम येणार नाही, हे माहीत असतानाही विकास कामांचा निव्वळ रतीब लावून ठेवला आहे. अर्थसंकल्पात काम समाविष्ट केलेले आहे, एवढे कारण समोर करून सध्या नगरसेवक विविध विकास कामांचे मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रक तयार करून घेण्यात मग्न आहेत. ई-टेंडरला विकास काम लावल्यानंतर एकही कंत्राटदार काम घेण्यास तयार नाही. कारण केलेल्या कामाचे वर्षानुवर्षे पैसे न मिळण्याची पद्धत रुढ झाली आहे. आमच्या वॉर्डातील विकासकामे घ्या, अशी विनंती कंत्राटदाराकडे करताना नगरसेवक दिसून येतात. ही केविलवाणी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचारच कोणी करीत नाही. अनेक नगरसेवक नातेवाईकांच्या, कार्यकर्त्यांच्या नावावर कामे करतात. आर्थिक शिस्त बिघडलेली असल्याने त्यांचेही कंबरडे मोडले आहे.