शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

देवणी गोवंशाला मिळाले ‘गोकूळ’

By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST

व्ही़ ए सक़ुलकर्णी , उदगीर दिल्लीपर्यंत धडक मारुन देशभर नाव मिळविलेल्या देवणी गोवंशाला राजाश्रय मिळू शकला नाही़ त्यामुळे ही जात नामशेष राहते की काय, अशी शंका निर्माण होत

व्ही़ ए सक़ुलकर्णी , उदगीरदिल्लीपर्यंत धडक मारुन देशभर नाव मिळविलेल्या देवणी गोवंशाला राजाश्रय मिळू शकला नाही़ त्यामुळे ही जात नामशेष राहते की काय, अशी शंका निर्माण होत असताना आता केंद्र सरकारनेच १५० कोटी रुपयांची तरतूद असलेल्या राष्ट्रीय गोकूळ योजनेत देवणी गोवंशाचा समावेश केल्याने पशुपालकांत उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे़केंद्र शासनाने नव्याने सुरु केलेल्या राष्ट्रीय गोकूळ योजनेत देशभरातील ६ प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे़ त्यामध्ये देवणी गोवंशाचाही समावेश झाला आहे़ या प्रजातींच्या संगोपन व संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे़ त्याअंतर्गत देवणी गोवंशासाठी १५० कोटींची तरतूद झाली आहे़देवणी या पशु प्रजातीचे मूळ उगमस्थान देवणी, उदगीर, जळकोटच्या भागात असल्याने त्याच्या संगोपन, संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची मागणी पशुपालकांची होती़ देवणी गोवंशासाठी तत्कालीन पशुसंवर्धन उपसंचालक डॉ़मुन्शी अब्दुल रहेमान यांनी मोठे प्रयत्न केले होते़ त्यांच्याच प्रयत्नातून देवणी गोवंश दिल्लीपर्यंत पोहोचले़ मात्र राजाश्रय मिळत नसल्याने ही प्रजात नामशेष राहण्याची भिती तयार झाली़ परंतु, आता मोठी तरतूद झाल्याने उदगीरच्या पशुविद्यापीठ उपकेंद्राच्या परिसरात दर्जेदार देवणी प्रक्षेत्राची उभारणी केली जाणार आहे़ यातून उत्कृष्ट देवणी जातीच्या गोवंश निर्मितीला प्रोत्साहित केले जाईल़ शिवाय, गोपालक संघ स्थापन करण्यासोबतच देवणी जातीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संघटनांना कामधेनू पशुपैदास संघटना असे नाव दिले जाणार आहे़ प्रशिक्षणासाठी शासकीय यंत्रणेचा उपयोग करुन घेतला जाणार आहे़ याच यंत्रणेकडून पशुंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत उपचार केले जाणार आहेत़ गेली कित्येक वर्षे या गोवंशाच्या संवर्धनासाठी धडपडत असलेल्या पशुपालकांना या योजनेमुळे चांगलाच आधार मिळणार आहे़ देवणी गोवंशाचा गोकुळमध्ये समावेश झाल्याने या भागातील पशूपालकांना मोठा लाभ होणार आहे़ त्यामुळे पशूपालनाची संख्याही वाढण्याची अपेक्षा आहे़राष्ट्रीय गोकूळ योजनेद्वारे देवणी गोवंशाच्या केवळ संवर्धनालाच चालना मिळणार असे नाही तर इतरही महत्वाकांक्षी उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत़ या प्रजातींपासून मिळणारे दूध, दुग्धजन्य पदार्थ, गोमूत्र, गांडूळ खत अशा पदार्थांचा ब्रँडही विकसीत करण्यात येणार आहे़ या पदार्थांच्या विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्मिली जाणार आहे़ त्यामुळे देवणी गोवंशाचे नाव पुन्हा देशभर जाण्याचा विश्वास वाढला आहे़ त्यामुळे पशूपालकांना चांगला लाभ होणार आहे़