शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरला येईल मार्चपासून गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:03 IST

औरंगाबाद : प्रस्तावित देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात येणारे सामान्य सुविधा केंद्र (सीएफसी) पूर्णत्वास येत असून येणाऱ्या ...

औरंगाबाद : प्रस्तावित देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात येणारे सामान्य सुविधा केंद्र (सीएफसी) पूर्णत्वास येत असून येणाऱ्या खऱ्या अर्थाने मार्चपासून हे क्लस्टर गती घेईल. या क्लस्टरमुळे औरंगाबादेतील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास स्थानिक उद्योजकांनी व्यक्त केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात नव्याने येणारे स्टार्टअप, व्हेंडर्स, लघु उद्योजकांसमोर आर्थिक, जागा, महागडी यंत्रसामग्री, संशोधन आणि विकास, टेस्टिंग या बाबींच्या मोठ्या समस्या आहेत. यापुढे त्यांना या सुविधा केंद्रातील यंत्रसामग्रीची मोठी मदत होणार आहे. उत्पादन खर्चातही मोठी बचत होणार असून इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाबाबत तांत्रिक मार्गदर्शनही उपलब्ध होईल. हे केंद्र (सीएफसी) मार्च २०२२ पासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरच्या संचालक मंडळाचे नियोजन आहे.

शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये २८ उद्योजकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या इलेक्‍ट्रॉनिक क्‍लस्टरच्या ‘सेंट्रल फॅसिलिटी सेंटर’च्या पहिल्या टप्प्याचे काम सन २०१७ पासून सुरू झाले. ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’च्या (सीएमआयए) माध्यमातून या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या केंद्राची इमारत आता तयार झाली असून लवकर वेगवेगळ्या मशिनरीही येथे उपलब्ध होतील. या सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी २०.५८ कोटी रुपये केंद्र सरकार, २.७२ कोटी रुपये राज्य सरकार आणि उर्वरित ५.२८ टक्के रक्कम उद्योजकांनी गुंतविली आहे. २ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या सुविधा केंद्राची इमारत व यंत्रसामग्रीसाठी २८.५८ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.

चौकट.........................

‘वर्ल्ड क्‍लास’ उत्पादने तयार करण्यास मदत

औरंगाबादेतील इलेक्‍ट्रॉनिक कंपन्यांना नवे प्रॉडक्‍ट तयार करण्यासाठी आणि संशोधनासाठी सामान्य सुविधा केंद्राची (सीएफसी) गरज होती. या केंद्राचा इलेक्‍ट्रॉनिक उद्योगांना चांगला फायदा होणार आहे. या सुविधा केंद्रामुळे प्रॉडक्‍ट रीसर्च, टेस्टिंग आदी कामांसाठी उद्योजकांना दुसऱ्या शहरात माराव्या लागणाऱ्या चकरा आता थांबतील. या क्‍लस्टरच्या माध्यमातून येथील इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांना ‘वर्ल्ड क्‍लास’ उत्पादने तयार करण्यासाठी मदत होणार आहे.

- सुरेश तोडकर, अध्यक्ष, देविगरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर