शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्याचे भाग्य उजाडेना

By admin | Updated: July 30, 2014 01:17 IST

औरंगाबाद : सातारा परिसरात प्रवेश करणाऱ्या आमदार रोडला १४ लाखांचा निधी मंजूर झाला; परंतु टेंडर दोन वेळा आचारसंहितेत अडकल्याने रस्ता तसाच उखडलेला आहे.

औरंगाबाद : सातारा परिसरात प्रवेश करणाऱ्या आमदार रोडला १४ लाखांचा निधी मंजूर झाला; परंतु टेंडर दोन वेळा आचारसंहितेत अडकल्याने रस्ता तसाच उखडलेला आहे.या रस्त्याने विद्यार्थी, कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसेसची सतत वर्दळ असते. भारत बटालियनच्या कर्मचाऱ्यांचीही ये-जा सुरू असून, सिमेंट रस्त्यावर अनेक खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणापूर्वी ते चांगले व्हावेत यासाठी रहिवाशांनी आवाज उठविला होता. जिल्हा परिषदेकडून या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे; परंतु लोकसभा व पदवीधर निवडणुकीदरम्यान टेंडर अडकले आणि कामात अडथळा आला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेने पुन्हा निविदा बोलावली असली तरी विधानसभेच्या निवडणूक आचारसंहितेत पुन्हा ती प्रक्रिया अडकते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. संग्रामनगर उड्डाणपुलापासून सातारा परिसर, गाव आणि भारत बटालियन व विविध महाविद्यालयांना जाण्यासाठी हाच रस्ता आहे. शहरात जाण्यासाठी हा एकमेव रस्ताआदळ आपटीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून रस्त्याचे भाग्य केव्हा उजळणार?शहरात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून, मुख्य रस्ता गुळगुळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पाठपुरावा सुरूजिल्हा परिषद सदस्य योगिता बहुले यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, रस्त्यासाठी निधी मंजूर असून, कामासाठी पाठपुरावा केला जात आहे. टेंडर काढण्यात आले असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.सातारावासीयांनाकायम त्राससातारावासीयांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात तत्परता दाखविली जात नाही. परिणामी नागरिकांना कायम त्रास सहन करावा लागतो. -वृषाली कुऱ्हेखड्ड्यांमुळे अपघाताची भीती वाढलीरस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात होण्याची भीती वाढली आहे. रस्ता मजबुतीचे काम विभागाने लवकर हाती घ्यावे. -स्नेहा पवारमुलांच्या जिवाशीखेळू नकाशाळकरी विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅनमधून या रस्त्याने जाताना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे घोडे नेमके अडले कुठे ?-सविता कुलकर्णी