शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

निधी असूनही कामे ठप्प; अभियंत्याला दिली ताकीद

By admin | Updated: November 22, 2015 23:40 IST

जालना : राज्य सरकारकडून निधी मंजूर करवून आणल्यानंतरही रस्त्यांच्या कामांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी

जालना : राज्य सरकारकडून निधी मंजूर करवून आणल्यानंतरही रस्त्यांच्या कामांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना चांगलेच खडसावले. सदर निधी वेळेत खर्च व्हावा व रस्त्यांची कामे नियोजित वेळेतच पूर्ण झाली पाहिजेत, अशा सक्त सूचना खा. दानवे यांनी कार्यकारी अभियंता यांना रविवारी दिल्या.खा. दानवे यांनी जालना शहरातील रस्त्यांसह भोकरदन ते हसनाबाद व भोकरदन ते जाफराबाद या रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे सांगितले. मात्र, निधी उपलब्ध असूनही या कामांची प्रक्रिया सुरू झाली नसल्याने त्यांनी बेलापट्टे यांची कानउघाडणी केली. तसेच जालना शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी ए.एस.आर. यांच्याकडे आलेला आहे. व सिल्लोड-भोकरदन, भोकरदन- हसनाबाद आणि भोकरदन-जाफराबाद या रस्त्यांसाठी जवळपास १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबतचा प्रस्तावच आपल्याकडे आला नसल्याचे त्यांनी खा. दानवे यांना सांगितले. त्यावर खा. दानवे यांनी बेलापट्टे यांना विचारले असता, याबाबतचा प्रस्ताव तात्त्काळ तयार करुन तो मुंबईत पाठविला जाईल, असे उत्तर दिले. तर जालना शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. याबाबतही पुढे काहीच झाले नसल्याने खा. दानवे यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारांमुळे आलेला निधी परत जाण्याची भीती व्यक्त करत भोकरदन नाक्यावरील अग्रसेन चौक ते शिवाजी पुतळा व्हाया टांगास्टॅण्ड, महावीर चौक ते मोतीबाग व्हाया मंमादेवी मंदिर, कचेरी रोड, शिवाजी चौक ते पाणीवेस आणि सावरकर चौक ते शोला चौक या रस्त्यांचे तातडीने काँक्रिटीकरणाचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी बेलापट्टे यांना दिले. शहरात तयार केले जाणारे रस्ते गुणवत्तापूर्ण असावे जेणेकरुन ते पुढील ३० वर्षे टिकले पाहिजेत, अशा सक्त सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. कुठल्याही जिल्ह्याचा विकास रस्त्याच्या मार्गानेच होत असतो. मात्र, सद्यस्थितीत जालना जिल्ह्यातील विविध भागांतील बहुतांश रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. खराब रस्त्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळीही गेले आहेत. असे असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे सोयरसूतक नसल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)