शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

देसलपर गुंतली पाटीदार मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

By admin | Updated: August 25, 2014 00:25 IST

औरंगाबाद : देसलपर गुंतली पाटीदार युवक मंडळातर्फे आज सकाळी पाटीदार भवनात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

औरंगाबाद : देसलपर गुंतली पाटीदार युवक मंडळातर्फे आज सकाळी पाटीदार भवनात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. ‘बात’ उन्हीं की होती हैं... जिन में कोई ‘बात’ होती हैं, अपनी कड़ी मेहनत और कर्तृत्व पर आपने दुनिया जिती हैं’ अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्र्यांनी देसलपर गुंतली पाटीदार समाजाचा गौरव केला. अगदी सकाळीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटीदार भवनात मोठी गर्दी झाली होती. विशेषत: महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे कंजुषी न करता हे सारे जण टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. त्यामुळे कार्यक्रम अगदी जिवंत वाटला. कार्यक्रमात रंगत येत गेली. आपल्या शेरशायरीयुक्त भाषणात शालेय शिक्षणमंत्र्यांनी गरजेनुसार घेतलेल्या शिक्षणामुळे कशी भरभराट होते, हे स्वानुभवावरून सांगितले. ‘डर मुझे भी लगा फासला देखकर... मैं बढ़ता गया रास्ता देखकर’ असा शेर यासंदर्भात त्यांनी सादर केला. अगदी प्लंबर, मेकॅनिक, कारपेन्टरसुद्धा आता महिन्याला लाख लाख रु. कमवू शकतात, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. राज्य शासनाने केलेल्या अनेक सुधारणावादी उपक्रमांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. प्रारंभी, भावेशभाई पटेल यांनी राजेंद्र दर्डा यांचा परिचय करून दिला. शिवजीभाई पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. खुशाल बाबूलाल पटेल, धवन पटेल, चेतन तेलानी, पीयूष भावेश पटेल, जगदीश पटेल, प्रीती पटेल, नीलेश पटेल, तरुण पटेल आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हिंमतभाई पटेल, केशवभाई पटेल, प्रवीण पटेल, दिनेश पटेल व गोपालभाई पटेल आदींची मंचावर उपस्थिती होती. होमगार्ड निदेशक संतोष लखोटिया यांचे स्वागत यावेळी गोपालभाई पटेल यांनी केले. सूत्रसंचालन संजय पटेल यांनी केले, तर आभार लक्ष्मीकांत पटेल यांनी मानले. विविध ठिकाणांहून हे गुणवंत आले होते. परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.