शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या अकॅडमिक ऑडिटसाठी महाविद्यालयांची उदासीनता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 18:18 IST

महाविद्यालयांनी अकॅडमिक आॅडिट केल्याशिवाय त्यांना विद्यापीठाची संलग्नता मिळणारच नाही.

ठळक मुद्देमुदतवाढ देऊनही फक्त ११९ महाविद्यालयांनी दाखल केले प्रस्ताव

औरंगाबाद : विद्यापीठाने अकॅडमिक ऑडिटसाठी मागविलेल्या प्रस्तावाला संलग्न महाविद्यालयांनी मुदतवाढ देऊनही प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. ३१ जानेवारीपर्यंत अवघ्या ३४ महाविद्यालयांनी पूर्ण प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपण्यास काही तास उरले असताना ११९ महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल केले. तर ३५० महाविद्यालयांनी लॉगिन आयडी तयार केले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना संलग्नता देण्यासाठी अकॅडमिक आॅडिट बंधनकारक केले आहे. यासाठी १६ जानेवारी रोजी प्रस्ताव मागविले होते. ३१ जानेवारीपर्यंत मुदत असताना केवळ ३४ महाविद्यालयांनीच प्रस्ताव दाखल केले होते. काही संस्थाचालकांच्या मागणीनुसार विद्यापीठ प्रशासनाने प्रस्ताव दाखल करण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. 

दीक्षांत सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अकॅडमिक आॅडिटसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, महाविद्यालयांना आॅडिटसाठी प्रस्ताव दाखल करण्यास १० फेब्रुवारीची मुदत दिली होती. मात्र दुपारपर्यंत ११९ महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. आॅडिट झालेल्या ६१ महाविद्यालयांचा निर्णय होण बाकी आहे. तर एकूण ३५० महाविद्यालयांनी प्रस्तावासाठीचा लॉगिन आयडी तयार केला आहे. सायंकाळपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यताही कुलगुरूंनी व्यक्त केली. 

तसेच महाविद्यालयांनी अकॅडमिक आॅडिट केल्याशिवाय त्यांना विद्यापीठाची संलग्नता मिळणारच नाही. त्याविषयी कायद्यातच तरतूद आहे. काही संस्थाचालकांनी नव्याने सुरू झालेले महाविद्यालय आणि जुने महाविद्यालय, अशी वर्गवारी करण्याची विनंती केली आहे. त्यावरही विचार करण्यात येत आहे. मात्र अकॅडमिक आॅडिटमधून कोणालाही सूट मिळणार नसल्याचेही कुलगुरू डॉ. येवले यांनी स्पष्ट केले.संवैधानिक अधिकाऱ्यांच्या मुलाखतीच्या तारखा ठरल्याविद्यापीठाच्या संवैधानिक अधिकाऱ्यांच्या मुलाखतींच्या तारखा ठरल्या आहेत. चार अधिष्ठातांच्या मुलाखती ७, ८ व १४ मार्च रोजी उस्मानाबाद उपकेंद्र संचालक आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक आणि १५ मार्च रोजी कुलसचिवपदासाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. येवले यांनी सांगितले. तसेच विद्यापीठातील ४५ विभागांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमॅट्रिक हजेरी सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.संतपीठाची केव्हाही घोषणा होईलपैठण येथील संतपीठाला विद्यापीठाचा दर्जा देण्याची घोषणा केव्हाही केली जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.येवले यांनी दिली. तीन दिवसांपूर्वी उच्चशिक्षणमंत्र्यांसोबत राज्यातील कुलगुरूंची बैठक झाली. या बैठकीमध्ये मंत्र्यांनी संतपीठाविषयी विविध विद्यापीठांना अभ्यासक्रम सुचविण्याच्या सूचना केल्या आहेत. हे स्वतंत्र विद्यापीठ असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय