शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

पीक विम्याची रक्कम होणार कर्जखाती जमा !

By admin | Updated: March 31, 2017 00:07 IST

उस्मानाबाद : सलग चार वर्ष दुष्काळाचा सामना केल्यानंतर गतवर्षी मुबलक पाऊस झाला.

उस्मानाबाद : सलग चार वर्ष दुष्काळाचा सामना केल्यानंतर गतवर्षी मुबलक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीसारख्या नगदी पिकांसोबतच पालेभाज्यांच्या लागवडीवर भर दिला. हा शेतीमाल बाजारपेठेत येताच दर कोसळले. त्यातच नोटाबंदीही करण्यात आली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना टोमॉटो रस्त्यावर फेकून द्यावे लागले. मध्यंतरी शेतकऱ्यांना गारपीटीचा माराही सोसावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पीक विम्याकडे लागल्या होत्या. ही रक्कम मिळाल्यानंतर आर्थिक स्थिती सुधारण्यास थोडाबहुत हातभार लागेल असे वाटत असतानाच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबुत करण्याची भाषा करणारे भाजप-सेनेचे सरकार विम्याची पन्नास टक्के रक्कम कर्जखाती जमा करून घेण्यास जिल्हा बँकांना मुभा देवून मोकळे झाले. शासनाच्या या भूमिकेविरूद्ध शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. याचा फटका जिल्हाभरातील सुमारे १५ हजार शेतकऱ्यांना बसणार असून तब्बल २५ कोटी रूपये कर्जखाती जमा करून घेतले जाणार आहेत. म्ाागील चार वर्षाचा दुष्काळ, चारा टंचाई, पाणी टंचाई, डोक्यावरील वाढते कर्ज यामुळे चिंताग्रस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट आत्महत्येचा पर्याय निवडला! वाढलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियानासह इतर विविध योजना राबविण्यास सुरूवात केली़ शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती मोहीमही हाती घेतली आहे़ अशा परिस्थितीत मागील वर्षी पडलेल्या परतीच्या पावसामुळे रबी हंगामातून काहीतरी पदरी पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे़ सध्या शेतातील पिकांची रास सुरू आहे़ शासनाकडून २०१५ मधील रबी हंगामातील पीक नुकसानीपोटी १६० कोटी रूपये अनुदान मिळाले आहे़ याचा लाभ जिल्ह्यातील २ लाख ५६ हजार शेतकरी सभासदांना होणार आहे़ नुकसान भरपाईची रक्कम आली असली तरी बँकेकडून वाटप सुरू करण्यात आलेले नाही़ अनुदानाचे वाटप कधी सुरू होणार ? याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले 3आहे़ मात्र, अशातच सहकारी संस्था सहाकर आयुक्त व निबंधकांनी जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीकोनातून नुकसान भरपाई अनुदान रक्कमेतून ५० टक्के रक्कम पीककर्जात वसूल करण्याचे आदेश दिले आहेत़जिल्हा बँकेचे शेती कर्जाची ५८४ कोटी एकूण कर्ज असून, यातील ३४८ कोटी रूपये थकीत आहेत़ तर बिगर शेतीचे जवळपास २३० कोटी रूपये एकूण कर्ज आहे़ तर १९६ कोटी रूपये थकीत आहेत़ मार्च अखेरमुळे बँकेने कर्ज वसुली मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांसह बड्या थकबाकीदार संस्थांना नोटीसा बजावल्या आहेत़ मुदतीत कर्जाचा भरणा न केल्यास थकबाकीदारांच्या घरासमोरच गांधीगिरी पध्दतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ त्यातच बँकेला बँकींग परवाना वाचविण्यासाठी ९ टक्के सीआर, एआर असणे आवश्यक आहे़ त्यासाठीही बँकेने कर्ज वसुलीसाठी विविध उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे़ मात्र, आता सहकारी संस्था सहाकर आयुक्त व निबंधकांनीच चक्क नुकसान भरपाई अनुदान रक्कमेतून ५० टक्क रक्कम पीक कर्जात वसूल करण्याचे आदेश दिले आहेत़ या आदेशानुसार जिल्ह्यातील जवळपास १५ हजार सभासदांकडून २५ कोटी रूपये कर्जाची वसुली होण्याची अपेक्षा बँकेला आहे़ बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने सहकार विभाग विचार करीत असले तरी रबी हंगामातील उत्पन्नातून खर्चही निघेल की नाही ? मिळालेल्या रक्कमेतून कर्ज फेडायचे कसे ? कुटुंबासमोरील प्रश्न मार्गी लावायचे कसे ? अशा एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असून, या निर्णयामुळे संताप व्यक्त होत आहे़शेतकऱ्यांनी सहकार्य करावेजिल्हा बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न केले जात आहेत़ सहकारी संस्था सहाकर आयुक्त व निबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार अनुदान रक्कमेतून जवळपास २५ कोटी रूपये पीक कर्जाची वसुली होण्याची अपेक्षा आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनीही सहकारी संस्था सहाकर आयुक्त व निबंधकांच्या आदेशानुसार होणाऱ्या कार्यवाहीत सहकार्य करावे, असे आवाहन डीसीसीचे कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील यांनी केले आहे़(प्रतिनिधी)