शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

'भानुदास-एकनाथ' जयघोषात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 17:40 IST

पायी वारी रद्द झाल्याने पालखी पुढील १८ दिवस श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात  मुक्कामी ठेवण्यात येणार आहे.  

ठळक मुद्देआषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला 

पैठण : पंढरपूर येथील आषाढी सोहळयासाठी  गुरुवारी दुपारी नाथमहाराजांच्या पादुका असलेल्या पालखीचे मोजक्या मानकऱ्यासह गावातील नाथ मंदिरातून प्रस्थान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  आषाढीवारीचा पायी सोहळा राज्य शासनाने रद्द केल्याने शासकीय निर्देशानुसार मोजक्या मानकऱ्यासह  टाळमृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान झाले. 

पायी वारी रद्द झाल्याने पालखी पुढील १८ दिवस श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात  मुक्कामी ठेवण्यात येणार आहे.  दरम्यान आज पालखी मार्गावर अंगणात उभे राहून नागरिकांनी दुरुनच पालखीचे दर्शन घेऊन पुष्पवृष्टी केली. सलग दुसऱ्या वर्षी पालखी सोहळा रद्द झाल्याने  सोहळ्यासोबत नियमित वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मात्र मोठी रूखरूख लागल्याचे दिसून आले.  वारकरी संप्रदायास भागवत रूपी खांब देणारे व संप्रदायाची समतेची, बंधुतेची पताका सदैव फडकवत ठेवणारे संत म्हणजे शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज होय. बये दार उघड म्हणत शोषीत व पिचलेल्या मनात संघर्षाची ठिणगी टाकून त्यांना जागृत करणाऱ्या संत एकनाथ महाराजांची विचारधारा समस्त वारकऱ्यांनी आज ही तेवत ठेवली आहे. सुमारे ४२५ वर्षापासून सुरू असलेल्या आषाढीच्या पंढरपूर वारीसाठी मराठवाडा भरातून वारकरी नाथांच्या पैठण नगरीत जमा होत. पुढे आनंदाने 'भानुदास एकनाथ' असा जयघोष करित विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पालखीसोबत दरमजल करित रवाना होतात. परंतु, यंदा कोरोनामुळे पायी वारी सोहळा रद्द झाल्याने वारकऱ्यांना  पैठणला येता आले नाही.  रघुनाथ महाराज पालखीवाले व  मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत भानुदास एकनाथ अशा गजरात गावातील नाथमंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. 

गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर थोडावेळ विसावा घेऊन  पालखी बाहेरील नाथ मंदिरात नेण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष सुरज लोळगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक किशोर पवार, मुख्याधिकारी संतोष आगळे, अरूण काळे, दिनेश पारीख, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, महेश जोशी, श्रीकृष्ण कुलकर्णी, चंद्रकांत आंबिलवादे, सुरेश गायकवाड, विलास पोहेकर, समीर शुक्ल, सिध्दार्थ परदेशी, बंडू आंधळे, वैभव पोहेकर, सुरेश गायकवाड, गौतम बनकर,रमेश लिंबोरे आदीसह भाविक उपस्थित होते. 

वारीची परंपरा ४२५ वर्षांचीपैठण ते पंढरपूर या पालखी सोहळ्यास ४२५ वर्षाचा इतिहास आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज हे विठ्ठलभक्त होते; ते नियमीत पैठण ते पंढरपूर आषाढी वारी करायचे. त्यांच्यानंतर एकनाथ महाराज यांच्यापर्यंत पंढरपूर वारी सर्वांनीच नियमित केली. 

नाथांच्या पादुकांची वारीसंत एकनाथ महाराज यांच्यानंतर त्यांचे पुत्र हरिपंडित महाराज यांनी पंढरपूर वारीसाठी संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली, ती आज तगायत सुरू आहे. हरिपंडित महाराजांना वारीची प्रथा खंडित होऊ नये म्हणून निजाम राजवटीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, एका वारीला तर नाथ महाराजांच्या पादुका गुपचूप घेऊन जाण्याचा प्रसंग हरिपंडित महाराजांवर ओढावला होता. निजामाच्या शिपायांच्या लक्षात येऊ नये म्हणून  पादुका डोक्यावर ठेवून त्यावर फेटा बांधून हरिपंडित महाराजांनी निजामाची हद्द पार केली, परंतु वारी मात्र खंडीत होऊ दिली नाही असे जेष्ठ नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांनी सांगितले. 

आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा भानूदास महाराज यांनी कर्नाटक (अनागोंदीच्या) राजाकडून पंढरपूर येथील मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती परत आणून  पंढरपूर येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली असल्याचा इतिहास आहे. भानुदास महाराजांची पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात समाधी असून याच  कारनाने नाथमहाराजांच्या पालखीस आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला करण्याचा मान मिळालेला आहे. शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAurangabadऔरंगाबाद