शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन विद्यार्थिनींचा डेंग्यू, तापाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:34 IST

पांगरी ता़ अर्धापूर येथील ऋतुजा दुधाटे व मनाठा येथील वर्षा मुरमुरे या विद्यार्थिनींचा अनुक्रमे डेंग्यू व तापाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना ११ सप्टेंबर रोजी घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव/अर्धापूर : पांगरी ता़ अर्धापूर येथील ऋतुजा दुधाटे व मनाठा येथील वर्षा मुरमुरे या विद्यार्थिनींचा अनुक्रमे डेंग्यू व तापाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना ११ सप्टेंबर रोजी घडली़पांगरी येथील ऋतुजा दुधाटे ही मीनाक्षी देशमुख विद्यालय, अर्धापूर येथे ९ वी वर्गात शिकत होती़ ८ सप्टेंबर रोजी ती पायाभूत चाचणी परीक्षेतील गणिताचा पेपर देऊन घरी आली़ त्याच दिवशी पोटात दुखत असल्यामुळे तिला नांदेडात एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते़ दोन दिवसांच्या उपचारानंतर ११ सप्टेंबर रोजी पहाटे ऋतुजाचा मृत्यू झाला़ तिला डेंग्यू झाला होता, असे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले़दरम्यान, मनाठा ता़ हदगाव येथील वर्षा चांदू मुरमुरे या मुलीचा तापाने ११ सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली़ ती मनाठा येथील आदर्श विद्यालयात ८ वी मध्ये शिकत होती़ तीन दिवसांपूर्वी तिला ताप आला होता़ त्यामुळे ती शाळेत गेली नाही़ मनाठा येथे उपचाराची सोय नसल्याने डोंगरकडा ताक़ळमनुरी येथील एका खाजगी रुग्णालयात नेले़ संबंधित डॉक्टरांनी तिला काही गोळ्या दिल्या़ या दरम्यान, अंगात ताप मुरून तिचा मृत्यू झाला़ हदगाव व अर्धापूर तालुक्यात आरोग्य सुविधांची मोठी समस्या आहे़ अनेक डॉक्टर मुख्यालयी राहून कर्तव्य बजावत नसल्याच्या तक्रारी आहेत़ मनाठा येथील आरोग्य उपकेंद्र नावालाच आहे असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला़ दर महिन्याला विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शाळेत व्हायला पाहिजे असा शासनाचा नियम आहे़ मात्र ती न झाल्याने वर्षाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे़ याला शाळेचे मुख्याध्यापक माधव रावळे यांनीही दुजोरा दिला़ आॅगस्टमध्ये डॉक्टर आले होते, त्यांनी विद्यार्थ्यांची यादी मागवली़ त्यानंतर तपासणीसाठी येतो असे त्यांनी सांगितले़ मात्र अद्यापही डॉक्टर आले नाहीत़