शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

साताऱ्यात डेंग्यूसदृश सोळा रुग्ण

By admin | Updated: August 8, 2014 01:24 IST

औरंगाबाद : सातारा गावात डेंग्यूसदृश आजाराचे ६ रुग्ण आढळून आले असून, दोन दिवसांपूर्वी १० असे एकूण १६ जण आढळून आले आहेत

औरंगाबाद : सातारा गावात डेंग्यूसदृश आजाराचे ६ रुग्ण आढळून आले असून, दोन दिवसांपूर्वी १० असे एकूण १६ जण आढळून आले आहेत. खाजगी रुग्णालयातील रुग्णांची परिस्थिती सुधारत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. साठवलेल्या पाण्याचे हौद व ड्रम रिकामे करून ते कोरडे करण्याची मोहीम सातारा गावात राबविली जात आहे. प्रत्येक घरातील पाण्याचे नमुने तसेच रक्ताचे नमुने तपासण्याचे काम आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका करीत आहेत. १००० घरांच्या तपासणीत ५,६०० लोकांपेक्षा अधिक महिला व पुरुष, मुलांची तपासणी केली असता १६ लोकांना थंडीताप आढळून आला, तर जवळपास ६४ घरांतील साठवलेल्या पाण्यात डासांची अंडी आढळून आली आहे. त्यामुळे घरातील हौद, ड्रम रिकामे करून कोरडे करण्याचा सल्ला आशा स्वयंसेविकांनी तसेच आरोग्य, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिला आहे. छोट्या फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणीने दोन दिवसांत दोनच वॉर्ड फवारण्यात आले. इतर वॉर्डांतही लवकरात लवकर फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करावी, अशी ओरड ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी केली आहे. डेंग्यूचा फैलाव होऊ नये म्हणून प्रत्येक वॉर्डातील कर्मचारी अधिकाऱ्यांकडे औषध फवारणी व अ‍ॅबेट औषध साठवलेल्या पाण्यात टाकण्यासाठी मागणी करीत आहेत. जिल्हा परिषदेने नवीन फॉगिंग मशीन पाठवावी, अशी मागणी राहुल शिंदे, ग्रा.पं. सदस्य अरुण कदम, राजू काका नरवडे, अयुब पठाण आदींनी केली आहे. पुणे येथे दुरुस्तीसाठी नेलेले फॉगिंग मशीन त्वरित आणून फवारणीचे काम हाती घेण्याची मागणी सातारा परिसरातील नागरिकांतून होत आहे.