शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डेंग्यू,मलेरियाचा शिरकाव

By admin | Updated: June 28, 2017 00:50 IST

औरंगाबाद : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत असल्याने शहर आणि परिसरात डेंग्यू आणि मलेरियाने शिरकाव केला आहे. महिनाभरात चार जणांना डेंग्यू, तर एकाला मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले आहे.पावसाळ्याला सुरुवात होताच कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर दिला जात आहे; परंतु पहिल्या, दुसऱ्या पावसानंतरच औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत.शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूर फवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरीही डेंग्यूने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. महिनाभरात शहरातील गांधीनगर, वानखेडेनगर आणि एन-११ परिसरात डेंग्यूचा प्रत्येकी एक असे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तसेच खुलताबाद येथे डेंग्यूचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, तर शहरातील गजानननगरमध्ये मलेरियाचा एक रुग्ण समोर आल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य उपसंचालक, तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे क रण्यात आले आहे.