शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

डेंग्यूच्या आजाराने जिल्हाभरात धास्ती कायम

By admin | Updated: November 10, 2014 01:16 IST

जालना : संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून डझनभर बळी गेल्यानंतर आता आरोग्य विभागाने तपासणी आणि जनजागरणाच्या कामाला सुरुवात केली आहे

जालना : संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून डझनभर बळी गेल्यानंतर आता आरोग्य विभागाने तपासणी आणि जनजागरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र जिल्ह्यात डेंग्यूविषयीची लोकांमधील धास्ती कायम असून भोकरदन, जाफराबाद, परतूर पाठोपाठ आता अंबड, घनसावंगी तालुक्यातही रुग्णांची संख्या वाढली आहे. बदनापूर, जालना, मंठा येथेही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत.गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. सर्वप्रथम भोकरदन तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. भोकरदन तालुक्यातील पद्मावती, अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे अनुक्रमे दोन व तीन जणांचा डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाला. परतूर शहर,जळगाव सपकाळ येथे एका तरूणाचा मृत्यू झाला. नळणी, कोदोली, वालसावंगी, लेहा, बठाण इत्यादी ठिकाणीही डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले.जिल्हा रुग्णालयात तापाचे रुग्ण दैनंदिन येत असले तरी डेंग्यूसदृश्य तापाच्या जवळपास शंभर रुग्णांवर आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात उपचार करणयात आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातही तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भोकरदन शहरासह तालुक्यात पद्मावती, नळणी, कोदोली, वालसावंगी, जळगाव सपकाळ, वाकडी, इब्राहिमपूर या ठिकाणी डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. बऱ्याच ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण होत नाही, हे वास्तव आहे. मात्र त्याचे गांभीर्य कुणालाच कसे नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. अंबड शहरासह तालुक्यात रोहिलागड, पारनेर, सोनक पिंपळगाव, हस्तपोखरी, शिरनेर, धनगरपिंप्री, सुखापुरी, लखमापुरी, गोंदी, वडीगोद्री, शहागड, महाकाळा, अंकुशनगर इत्यादी गावातही डेंग्यसदृश्य तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, कुंभारपिंपळगाव, मंगरूळ, भोगाव, पानेवाडी, राणीउंचेगाव, पारडगाव, रांजणी इत्यादी गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वडीगोद्री परिसरात रुग्णसेवा लवकर मिळत नसल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. संस्कृती तुकाराम वायाळ (वय ६) ही मुलगी डेंग्यूसदृश्य तापाने आजारी असून तिला औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वडीगोद्री येथील केंद्रावर डॉक्टर हजर राहत नाहीत. याबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी गेल्यानंतरही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कुंभारपिंपळगाव परिसरात डेंग्यूसदृश्य तापाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. दोन जणांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गावात कचऱ्याचे ढीग, साचलेले पाणी वेळीच साफ करण्यात आलेले नाही. मागील महिन्यापासून गावात धूरफवारणी यंत्रणा बंद आहे. कुरैशी मोहल्ला, आझादनगर, झोपडपट्टी परिसरात रुग्णांची संख्या जास्त आहे. नाल्यांची सफाई झाले नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डेंग्यूसदृश्य रूग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉ. सूरज आर्दड यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामपंचायतीमार्फत साफसफाई मोहिम हाती घेण्यात आल्याचा दावा ग्रामविकास अधिकारी एस.एस. पवार यांनी केला आहे. तसेच आरोग्य विभागानेही घरोघर पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात येत असल्याचा दावा केला. अनेक गावांमध्ये रामभरोसेग्रामीण भागात तांडे, वाड्यांवर तर अस्वच्छतेने कहर केला आहे. नागरी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे साथीचे आजार वाढत असून त्याचा उद्रेक झाला आणि गाव प्रकाशझोतात आले की उपाय सुरू होतात. तोपर्यंत सगळे निमूटपणे सहन केले जाते. कुणीच गांभीर्याने घेत नसल्याने पंचायत समिती ग्रामपंचायतींना सूचना देत नाही. आरोग्य विभागही स्वत:हून जागृती करीत नाही. त्यामुळे नागरिक रामभरोसे जगत आहेत. (प्रतिनिधी)