शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अनेक भागांत डेंग्यूचा उद्रेक

By admin | Updated: September 4, 2016 01:05 IST

औरंगाबाद : शहरात कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूवर नियंत्रण येत नाही. नियंत्रण येण्याऐवजी उलट ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात त्याचा सर्वाधिक फैलाव होत असल्याचे दिसते.

औरंगाबाद : शहरात कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूवर नियंत्रण येत नाही. नियंत्रण येण्याऐवजी उलट ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात त्याचा सर्वाधिक फैलाव होत असल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचे तब्बल ४४ रुग्ण आढळले. यामध्ये एकट्या औरंगाबाद शहरातील रुग्णांची संख्या ३५ आहे. तर ग्रामीण भागात अवघे ९ रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने मनपा, आरोग्य विभागातर्फे विविध भागांमध्ये कोम्ब्ािंग आॅपरेशन हाती घेण्यात आले. त्यासाठी खास पथक तयार करण्यात आले. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन अशा ठिकाणची डासांची अळी नष्ट केली जाते. ज्या ठिकाणी हे शक्य होत नाही, त्या ठिकाणी अ‍ॅबेट टाकून डासांची अळी नष्ट केली जाते. यासह कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूचा विळखा कमी होत नसल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांत डेंग्यूचे तब्बल ४४ रुग्ण आढळून आले. याशिवाय शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जोखमीच्या वसाहतींसह उच्चभ्रू वसाहतींमधील रहिवाशांनाही डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. जुलै, आॅगस्टमध्ये सर्वाधिक रुग्णपावसाला सुरुवात होत नाही, तोच साथरोगांचा फैलाव सुरू झाला. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण समोर आले. केवळ आॅगस्ट महिन्यात डेंग्यूचे शहरात १० तर ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळून आले.धूरफवारणी, अ‍ॅबेट टाकणे, कंटेनर सर्वेक्षण यासह जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा स्वच्छ क रून कोरडे केले पाहिजे. शिवाय पाण्याचे साठे योग्य पद्धतीने झाकून ठेवावेत. नागरिकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.- अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी