शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘डेंग्यू कंट्रोल करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:55 IST

शहर स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करुन गुरुवारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणावी, नसता उद्भवणा-या परिणामास नगरपालिका जबाबदार राहील अशा शब्दात मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांना जिल्हाधिका-यांनी सुनावले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात फैलावत चाललेला ताप, डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बीड शहरात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याची बाब पुढे आल्यानंतर शहर स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करुन गुरुवारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणावी, नसता उद्भवणा-या परिणामास नगरपालिका जबाबदार राहील अशा शब्दात मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांना जिल्हाधिका-यांनी सुनावले. तसेच सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिका-यांना साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी सूचना करण्यात आल्या.गुरुवारी डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठकीस सीईओ धनराज निला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ.भोकरे, सोळूंके, मधूकर वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिका-यांनी डासांपासून होणाºया डेंग्यूसारख्या आजारावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. धूर फवारणी, अ‍ॅबेटींग यासारखे तातडीची प्रतिबंधात्मक उपयायोजना करावी. तसेच तापेचे रुग्ण आढळल्यास तात्काळ आरोग्य पथक पाठवून त्यांची योग्य तपासणी करुन व लक्षणे पाहून औषधोपचार करावा. डासांपासून होणाºया आजारामुळे कोणत्याही रु ग्णाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. आरोग्य विभागाने डासांपासून होणाºया आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्यसेविका, आशा वर्कर यांची मदत घ्यावी असे जिल्हाधिकारी या वेळी म्हणाले. बैठकीत बीड शहरातील अस्वच्छतेचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला.या बैठकीस जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.