शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांऐवजी धनदांडग्यांची नावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:21 IST

घरकुलांसाठी शासनाने सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार तयार केलेल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये धनदांडग्यांची नावे आल्याने ती न वगळता नमुना ड भरून त्यात गोरगरिबांची नावे टाकण्यात आली होती. मात्र आता ही यादीच पंचायत समितीत धूळखात पडल्याने एकाही गावातील या लाभार्थ्याला घरकुल मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. याबाबत राकॉंचे तालुकाध्यक्ष माधव कोरडे यांनीही प्रशासनाकडे तक्रार करून यातील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

हिंगोली : घरकुलांसाठी शासनाने सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार तयार केलेल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये धनदांडग्यांची नावे आल्याने ती न वगळता नमुना ड भरून त्यात गोरगरिबांची नावे टाकण्यात आली होती. मात्र आता ही यादीच पंचायत समितीत धूळखात पडल्याने एकाही गावातील या लाभार्थ्याला घरकुल मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. याबाबत राकॉंचे तालुकाध्यक्ष माधव कोरडे यांनीही प्रशासनाकडे तक्रार करून यातील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.प्रायोरिटी लिस्टमधील लाभार्थ्यांची संवर्गनिहाय यादी जाहीर झाल्यानंतर नमुना डमध्ये प्राप्त अर्जांचे सर्वेक्षण करून ही यादी समितीसमोर सादर करून अंतिम करण्यास सांगण्यात आले होते. यासाठी ५0 हजारांच्या आसपास अर्ज आल्याचे सांगितले जात होते. मात्र यासाठी एक महिन्याची मुदत दिलेली असताना १८ महिने उलटून गेल्यावरही कोणतीच प्रक्रिया झाली नाही. गटविकास अधिकाºयांनीही वरिष्ठांच्या सूचना नसल्याचे सांगून याद्या लाल फितीत अडकविल्या. मात्र प्रायोरिटी लिस्टमध्ये केवळ ११ हजार लाभार्थीच आले होते. त्यातही अल्पसंख्याकचे उद्दिष्ट तर पहिल्याच वर्षी संपले. आता यंदा या संवर्गातील लाभार्थी निवडायचा कसा? हा प्रश्न आहे. यासाठी यंदा १५४ एवढे उद्दिष्ट आहे. तर रमाई आवास व राज्याच्या इतर घरकुलांसाठीही लाभार्थी नमुना डमधून अंतिम झालेले लाभार्थी निडण्यास शासनाने सांगितले. मात्र तरीही हिंगोली जिल्ह्यात ही यादी अंतिम नाही.पत्रच माहिती नव्हतेआॅगस्ट २0१४ मध्ये अवर सचिव असिम गुप्ता यांनी दिलेल्या पत्रात प्रायोरिटी यादी व विषय ड यादीवर काय कारवाई करायची याची माहिती होती. यात प्रायोरिटी यादी झाल्यानंतर या यादीत नसणाºया परंतु प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेसाठी ग्रामसभेने ड यादीत सुचविलेल्या नवीन लाभार्थ्यांच्या याद्या तालुका समितीने छाननी व आवश्यकतेनुसार स्थळतपासणी करून जिल्हा समितीमार्फत एक महिन्यात अंतिम करण्यास सांगितले होते.मात्र अशा समित्यांचीही स्थापना नाही अन् हे पत्रही माहिती नव्हते.काम सुरूया याद्यांवर आता पंचायत समित्यांनी काम सुरू केल्याचे प्रकल्प संचालक मुकीम देशमुख यांनी सांगितले.