शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ई-पोर्टलच्या विरोधात औषध विक्रेत्यांचा मूकमोर्चा

By admin | Updated: May 31, 2017 00:35 IST

लातूर : देशभरासह राज्यात बेकायदेशीर इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषध विक्री आणि ई-पोर्टलच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५०० औषधी विक्रेत्यांनी मंगळवारी बंद पुकारला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : देशभरासह राज्यात बेकायदेशीर इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषध विक्री आणि ई-पोर्टलच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५०० औषधी विक्रेत्यांनी मंगळवारी बंद पुकारला होता. लातुरात जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारने तातडीने घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रवीण पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जी अद्ययावत सुविधा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, त्याचा अधिकृत शासकीय मसुदा झालेला नसतानाही त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा घाट घातला जात आहे. ई-पोर्टलच्या माध्यम, आतून सर्व औषधींचे प्रिस्क्रिप्शन त्यावर नोंदविणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे असे नाही. त्याचप्रमाणे सर्वच औषधी दुकानांमध्ये संगणकाची सोय असेलही असे नाही. परिणामी, या ई-पोर्टलला विरोध करण्यासाठी लातूर जिल्हा केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी सकाळी मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष चापसी, ईश्वर बाहेती, नागेश स्वामी, राजकुमार राजारुपे, अरुण सोमाणी, भांगडिया, अतुल कोटलवार, प्रकाश रेड्डी, मनोज अगाशे, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.