लातूर : आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना शिवसेनेचे अभय साळुंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली होती़ या मारहाणीचा रविवारी झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत निषेध करण्यात आला़ मारहाण प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली़ तसेच ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गांधी चौकातून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़ शिवसेनेचे अभय साळुंके यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांकडून आरटीआय कार्यकर्ते भाईकट्टी यांना शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन मारहाण करण्यात आली होती़ यातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही़ मारहाण केल्याची जबाबदारी घेतली असतानाही त्यांना पकडण्यात आले नाही, असा आरोप यावेळी झाला़ शेतकरी कामगार पक्षाचे अॅड़ उदय गवारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे नरेंद्र अग्रवाल, मोईज शेख, कैलास कांबळे, राष्ट्रवादीचे अशोक गोविंदपूरकर, शैलेश स्वामी, संजय सोनकांबळे, भाजपाचे अॅड़ प्रदीप मोरे, अर्चनाताई आल्टे, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, प्रा़ व्यंकट किर्तने, ‘आप’चे बाळ होळीकर, बसपाचे रघुनाथ बनसोडे, महाराष्ट्र विकास आघाडीचे बसवंतप्पा उबाळे तसेच प्रा़ उत्तम गायकवाड, भोसले, प्रा़हर्षवर्धन कोल्हापूरे, नारायण कांबळे, प्रशांत चव्हाण, रामकुमार रायवाडीकर, संतोष गिल्डा, इस्माईल फुलारी, ओमप्रकाश आर्य, नितीन लोखंडे, मनोज डोंगरे, केदार रासुरे, अभय सूर्यवंशी, सुनील मंदाडे, शिलरत्न कांबळे, शेख अब्दुल्ला, रणधीर सुरवसे, प्रा़ एम़ बी़ पठाण आदींनी भाईकट्टी यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला़
मारहाणीच्या निषेधार्थ मूकमोर्चा
By admin | Updated: November 2, 2015 00:18 IST