कृष्णकुमार खंडेलवाल , उंडणगाव शेती मालास भाव कमी-जास्त असो; मात्र शेतीतील टाकाऊ मालास मागणी वाढत असल्याने शेतकर्यांना यापासून थोडा आधार मिळत आहे. दरवर्षी सोयाबीन भूस, दाणे काढल्यानंतर उरलेले मक्याचे सुट्टे, गव्हाचे भूस, पºहाटी आदी टाकाऊ पदार्थ शेतकरी उपयोगात येत नसल्याने जाळून टाकत असे; मात्र मागील दोन-तीन वर्षांत या वस्तूंची खरेदी सुरू झाल्याने टाकाऊ मालाचेही आता पैसे मिळत आहेत. शेतातील पºहाटी उपटून एका ठिकाणी जमा करून त्यास जाळावे लागत असे, तसेच पºहाटी उपटण्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांना मजुरी खर्च करावी लागत असे. आता यंत्राद्वारे शेतात या पºहाटीचा चुरा करण्याचे यंत्र आल्याने खरेदी करणारा स्वत: स्वखर्चाने पºहाटी उपटून चुरा करीत आहे. या पºहाटीचा शेतकर्याला मोबदला मिळत नसला तरी त्याचा त्रास व खर्च वाचत आहे. हा पºहाटी चुर्यास बरीच मागणी आहे. यासह या भागातून मोठ्या प्रमाणावर मक्याचे सुट्टे औरंगाबादसह गुजरात राज्यात विक्री होतात. सुट्टे खरेदी करणार्या व्यापार्यांनी मळणीयंत्र मालकामार्फत खरेदी सुरू केल्याने सुट्टे द्या मका काढणीचे पैसे देण्याची गरज नाही या तत्त्वावर खरेदी सुरू केली आहे. अँग्री वेस्ट खरेदीवर भर असला तरीही या टाकाऊ पदार्थावर प्रक्रिया करण्याचे कारखाने याच भागात उभारून कारखान्यात जाळता येईल या आकाराचे तुकडे तयार केल्यास वाहतुकीचा खर्च वाचून शेतकर्यास जास्त दर मिळेल, अशी माहिती महेश सुरडकर, संजय वैद्य, दादाराव कौशल्ये, डॉ. तानाजी सनान्से, नारायण भागवत, शांताराम पंडित, अशोक बाबूलाल बसैये या शेतकर्यांनी दिली. शेतकर्यांचा त्रास कमी होत आहे. अनेक मोठ्या कारखान्यात बॉयलरसाठी यांचा जळतन म्हणून उपयोग होत आहे. कारखानदारांनी यासाठी यंत्रणादेखील ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्याने अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
शेतीच्या टाकाऊ मालास मागणी
By admin | Updated: June 3, 2014 01:09 IST