बीड: धनगर समाजाची अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी राजकीय स्वार्थापोटी केली जात असल्याचा आरोप करीत शुक्रवारी आदिवासी आरक्षण बचाओ समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता़आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण आजही अत्यंत अल्प आहे़ शासनाच्या योजनांचा अजून ही पूर्णपणे लाभ आदिवासींना मिळालेला नाही, अशी अवस्था असताना देखील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करण्याची मागणी होत आहे़ ही होत असलेली मागणी निव्वळ राजकीय द्वेशापोटी होत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे़ आदिवासी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण महत्वाचे आहे़ जर धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश केला तर हा आदिवासी समाजावर अन्याय असेल असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़ यावेळी आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पवार, रविंद्र पवार, सुनिल बळवंते, सुमित्रा पवार, संतोष माळी उपस्थित होती़ (प्रतिनिधी)माजलगाव येथील भोई समाजातील मच्छीमारांवर मागील अनेक महिन्यांपासून ठेकेदार अन्याय करीत आहेत. भोई समाजातील महिलांवर ठेकेदारांच्या गुंडांनी हल्ला केला. या गुंडांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटना व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. माजलगाव येथील धरणाचा मच्छीमारीचा ठेका चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला आहे. यामुळे येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात मच्छीमारांनी आंदोलन केले होते. मात्र येथील संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासन मुद्दामहून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. याप्रसंगी अॅड.संगीता धसे, जयसिंग चुंगडे, विपुल पिंगळे, डॉ. जयश्री मुंडे, भागचंद परदेशी, संतोष पाबळे उपस्थित होते.
स्वार्थापोटी केली जातेय आरक्षण मागणी
By admin | Updated: August 9, 2014 00:33 IST