शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:26 IST

सरकारने शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रा. एच.एम. देसरडा यांनी रविवारी (दि.१३) पत्रकार परिषदेमध्ये केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी ओढ दिल्यामुळे झालेल्या खरीप पीकबुडीने शेतकरी हवालदिल झाला आहे. हे अस्मानी संकट आता सुल्तानी बनत असून, सरकारने शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रा. एच.एम. देसरडा यांनी रविवारी (दि.१३) पत्रकार परिषदेमध्ये केली. महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळातर्फे आयोजित या पत्रपरिषदेमध्ये कृष्णा हरिदास व डॉ. कृष्णा हातोटे उपस्थित होते.चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत ५३१ शेतक ºयांनी आत्महत्या केल्याचे सांगत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेल्यावर्षी जरी भरघोस पीक आले असले तरी त्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी कर्जफे ड करू शकले नाहीत. ‘तत्त्वत:’ कर्जमाफी दिली खरी; परंतु तीदेखील व्यवस्थित अमलात आणली गेली नाही. कर्जमुक्तीच्या प्रश्नावर फडणवीस सरकारने विश्वासघात केला असून, पीकविम्यामध्ये त्यांनी अत्यंत चलाखीने केवळ कंपन्यांचा फायदा केला.या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे तेथे लवकरात लवकर दुष्काळ किंवा सरकारी शब्दावलीप्रमाणे ‘टंचाईसदृश स्थिती’ घोषित करण्याची मागणी केली आहे. रोजगार हमी योजनेची कामे पुन्हा सुरू करणे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार गावागावांत अन्नपुरवठा करणे, सरसकट शेतकºयांना पीकविम्याचे संरक्षण द्यावे, आदी मागण्यात करण्यात आल्या आहेत.