यावर्षी अपुऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण आहे. या पार्श्वभूमीवरच जिल्हा महसूल प्रशासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांकडील पीक कर्ज माफ करावे, दुबार पेरणीसाठी ताबडतोब मदत जाहीर करावी, नवीन पीक कर्जाचे वाटप त्वरित सुरु करावे, गारपीट अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करावे, ठिबक सिंचन संचाचे थकीत अनुदान वितरीत करावे, सरसकट पीक विमा लागू करावा, विविध पिकांच्या १५ बीटी वाणांवरील बंदी उठवावी, व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष चिन्नादोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवळी, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोहिते, उपाध्यक्ष सुरेश काळे, प्रल्हाद दहीभाते, तालुकाध्यक्ष दिपक चिमणे आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By admin | Updated: August 6, 2014 02:15 IST