शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

दिल्लीच्या बुकीचे देशभरात नेटवर्क

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

औरंगाबाद : आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आॅनलाईन सट्टा खेळविण्यासाठी नरेश पोतलवाड यास लाईन देणाऱ्या दिल्लीतील दोन मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी अटक करून आणले

औरंगाबाद : आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आॅनलाईन सट्टा खेळविण्यासाठी नरेश पोतलवाड यास लाईन देणाऱ्या दिल्लीतील दोन मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी अटक करून आणले. या आरोपींनी देशभरातील विविध शहरांत अशा प्रकारचा सट्टाबाजार सुरू केल्याचे समोर आले आहे. सोमवारी न्यायालयाने या दोघांना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक झाली आहे.अमित बाली आणि प्रिन्स ऊर्फ सोमनाथ बहल, अशी दिल्ली येथून अटक करून आणलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सायबर क्राईम सेलकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पो.नि. गौतम पातारे यांनी दोन्ही आरोपींना दिल्लीतील हकीकतनगर या भागातून ताब्यात घेतले. न्यायालयाकडून त्यांची प्रवास कोठडी घेऊन त्यांना रविवारी रात्री औैरंगाबादेत आणून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांना अटक केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले की, आरोपी बाली आणि बहल यांनी आरोपी पोतलवाड यास किरायाने लाईन दिली होती. ते पोतलवाड यांच्याकडून त्याकरिता प्रति महा चार हजार रुपये भाडे घेत असत.स्वत:च्या घरात मिनी टेलिफोन एक्स्चेंज सुरू करणाऱ्या पोतलवाड यास सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रसंगी पोलिसांनी आणखी पुरावे गोळा करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.