शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय शिक्षणाचा बोजवारा

By admin | Updated: August 7, 2014 23:35 IST

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०११-१२ मध्ये पाच संगणक संच देण्यात आले होते.

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०११-१२ मध्ये पाच संगणक संच देण्यात आले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे हे संगणक दोन वर्षापासून शाळेत धूतखात पडून आहेत.सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला संगणक देण्यात आले होते. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे, याकरीता जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आले. परंतु या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे.जळगाव सपकाळ येथील केंद्रीय शाळेत पहिली ते सातवीपर्यंत ३५० ते ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, या शाळेवर विद्यार्थ्यांना सुविधाच्या नावाने वाणवा भास्त आहे. त्यामध्ये शाळेवर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची सुविधा नाही. घरूनच विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी न्यावे लागत आहे. संगणक कक्ष आहे. परंतु, लाईट नाही. तसेच संगणकीय शिक्षण देण्याकरीता शिक्षक नाही. एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात ही शाळा अडकली असून, याकडे ना शिक्षण समितीचे लक्ष ना शिक्षण विभागाचे. या सर्व बाबींमुळे शिक्षण विभागाच्याच संगणकीय शिक्षण योजनेचा बोजवारा उडाला आहे. याकरीता शिक्षण विभागाने लक्ष देण्याची व विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पावले उचलावी, अशी अपेक्षा पालकांची आहे. (वार्ताहर)शाळेत पहिली ते सातवीपर्यंत ३५० ते ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात.या विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे, यासाठी सर्वशिक्षा अभियानातर्गत शाळेस पाच संगणक संच देण्यात आले होते. मात्र संगणकीय शिक्षण देण्याकरीता शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन वर्षापासून नुकसान होत आहे.