मुखेड/जांब : तालुक्यातील जांब बु. येथे कल्याण नावाचा मटका चालविणार्या मटका अड्डय़ावर ५ जानेवारी रोजी देगलूर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात मटका चालविणार्यासह ४ हजार ३00 रुपये, मटक्याच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या. जांब येथे राज्य रस्त्यावरील एका पानटपरीत मटका नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती देगलूरच्या उपविभागीय पोलिस अधिकार्यांना अज्ञात व्यक्तीने दिली. उपविभागीय पोलिस अधिकार्यांच्या पथकाने छापा टाकला. 'कल्याण' नावाचा जुगार चालविणार्या मारोती विठ्ठल कर्हाळे (रा. दत्तनगर, जांब) यास रंगेहाथ पकडले. पोलिस कर्मचारी बाबाराव भुजंगराव वडंगीर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास ठाणे अंमलदार बी. के. भारती हे करीत आहेत.
जांबमधील मटका अड्डय़ावर देगलूर पोलिसांचा छापा
By admin | Updated: January 6, 2015 13:05 IST