बीड : गतवर्षी कमी तरतूद असताना कोट्यवधी रूपयांची देयके खिरापतीप्रमाणे वाटल्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे बजेट कोलमडणार आहे. शुक्रवारी अर्थसंकल्पासाठी बोलाविलेल्या विशेष सभेत तुटीचा अर्थसंकल्प मंजूर होणार आहे. जि. प. च्या वित्त विभागाने गतवर्षी इमारत बांधकाम व दळणवळणावर केवळ २ कोटी ९९ लाख ५७ हजार रूपयांची तरतूद केली होती. मात्र तत्कालीन सीईओ व मुख्य वित्त व लेखाधिकारी यांनी ३२ कोटी ११ लाख १० हजार रूपये खर्च केले. पाटबंधारे विभागातील कामांच्या बाबतीतही अशीच वारेमाप उधळपट्टी करण्यात आली. परिणामी, मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात ११ कोटी ७२ लाख रूपयांची तरतूद असताना चालू वर्षी सुमारे ४१ कोटी १३ लाख ५२ हजार रूपये इतका खर्च झाला. त्यामुळे जि. प. वित्त विभागात उणे २९ कोटी २६ लाख रूपये आहेत. परिणामी, यावर्षी केवळ " १० कोटी रूपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे. निधी वळविल्याने वाढले देणे वित्त विभागाने गतवर्षी मुद्रांक शुल्कापोटी उपलब्ध झालेले " ३ कोटी १५ लाख ४० हजार खर्च केले. शिवाय चालू वर्षीचे " ४ कोटी ८५ लाख २२ हजार देणे आहे. समाजकल्याण विभागाचे २० टक्के म्हणजे " १८ कोटी ६२ हजार ५०० देणे आहे. निधी वळविल्यामुळे आता तो द्यावाच लागणार आहे. उणे २९ कोटी असे बजेट असताना आणखी " १८ कोटी वित्त विभागाला देणे आहे. त्यामुळे वित्त विभागाची अडचण झाली आहे. (प्रतिनिधी)