शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने केली हरणाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:03 IST

वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी अमरावतीचे पथक वाळूज शिवारात दाखल झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे.वाळूज शिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास काही शेतकरी आपल्या शेतात गेले असता बप्पा सरोदे यांच्या शेतात एक हरिण मृतावस्थेत दिसून आले. गत काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्यामुळे हरणाची शिकार बिबट्यानेच केली असावी, असा संशय व्यक्त करीत शेतकऱ्यांनी दौलताबाद वनविभागाचे वनक्षेत्रपाल एस.वाय. गवंडर, वनरक्षक मनोज कांबळे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. दरम्यान, वाळूज शिवारात बिबट्याने हरणाची शिकार केल्याची माहिती वा-यासारखी पसरल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वी श्रीरंग आरगडे या शेतक-यास दुचाकीवरून जात असताना बिबट्याने दर्शन दिले होते. या घटनेनंतर आठवडाभरापूर्वी राजू गायकवाड यांच्या शेतात या बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला होता. या परिसरात अधून-मधून बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे शेतीकामासाठी जाणारे शेतकरी व मजुरांत भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे घाबरलेल्या नागरिक व शेतकºयांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केल्यामुळे सोमवारी या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.सकाळी घटना आली समोरवाळूज शिवारात सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्याचे आज सकाळी शेतक-यांना दिसून आले. या घटनेमुळे भयभित झालेल्या शेतक-यांनी वन विभागाशी संपर्क साधल्यानंतर मंगळवारी सकाळी वनक्षेत्रपाल एस.वाय. गवंडर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मनोज कांबळे, वनमजूर प्रभू हजारे, बाबूलाल गुंजाळ, साहेबराव तुपे, मच्छिंद्र देवकर आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पहिल्बिबट्याने हरणाची मान घट्ट पकडून हरिण निपचित पडल्यानंतर त्याचा फडशा पाडल्याचे वन विभागाच्या पथकाला दिसून आले. या मृत हरणाला ताब्यात घेऊन दौलताबाद येथे शवविच्छेदन करण्यात आल्याचे वन क्षेत्रपाल गवंडर यांनी लोकमतशी बोलतानासांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग