शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

By admin | Updated: August 31, 2016 00:35 IST

औरंगाबाद : सलीम अली सरोवराजवळील ड्रेनेज लाईनमध्ये उतरून काम करणाऱ्या प्रदीप हरिश्चंद्र घुले या २५ वर्षीय तरुण कामगाराचा विषारी वायुमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला.

औरंगाबाद : सलीम अली सरोवराजवळील ड्रेनेज लाईनमध्ये उतरून काम करणाऱ्या प्रदीप हरिश्चंद्र घुले या २५ वर्षीय तरुण कामगाराचा विषारी वायुमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. मंगळवारी घुलेच्या कुटुंबियांनी घाटीत मृतदेह घेण्यास नकार दिला. महापौर त्र्यंबक तुपे यांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.शताब्दीनगर येथील प्रदीप घुले आणि शेख अकबर शेख खाजा हे दोघे कामगार कंत्राटदार प्रभाकर मते पाटील यांच्याकडे काम करीत असत. सोमवारी दोघे हडको एन-१२ परिसरातील विविध ड्रेनेज लाईनचे काम करून निघून गेले. घुले हा सायंकाळी बायको मुलीसह नातेवाईकांकडे गेला. यावेळी कंत्राटदार मते यांनी त्याला परत कामावर अर्जंट येण्यास सांगितले. न आल्यास कामावरून काढून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे घुले धावत-पळत सलीम अली सरोवराजवळील विसर्जन विहिरीजवळ पोहोचला. तेथे ड्रेनेजची तपासणी करण्याचे आदेश कंत्राटदाराने दिले. घुले मागचा पुढचा विचार न करता चेम्बरमध्ये उतरला. आतील विषारी वायुमुळे तो गुदमरून बेशुद्ध झाला. त्याला पाहण्यासाठी शेख अकबर खाली गेला. तो सुद्धा बेशुद्ध होऊन आत पडला. या घटनेची माहिती त्वरित अग्निशमन दलाला देण्यात आली. रुग्णालयात नेईपर्यंत घुले याचा मृत्यू झाला. शेख अकबर मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्या मेंदूत विषारी वायू गेला आहे. जोपर्यंत त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला मिळत नाही, तोपर्यंत घाटीत मृतदेह घेणार नाही, अशी भूमिका घुले कुटुंबियांनी घेतली. महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी घाटीत जाऊन घुले कुटुंबियांना आर्थिक मोबदला देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला.प्रदीप घुले याच्या मृत्यूस कारणीभूत असलेला दोषी कंत्राटदार आणि मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वपक्षीय दलित अत्याचारविरोधी कृती समितीतर्फे करण्यात आली.