शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुदतवाढीची घोषणा; लेखी आदेशच नाहीत !

By admin | Updated: April 16, 2017 23:11 IST

लातूर : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तूर हमीभाव खरेदी केंद्रांना आठवडाभराची मुदतवाढ दिल्याची घोषणा झाली मुदतवाढीची घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे.

लातूर : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तूर हमीभाव खरेदी केंद्रांना आठवडाभराची मुदतवाढ दिल्याची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्षात नाफेडच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात रविवारी सायंकाळपर्यंत कुठलेही आदेश आले नसल्याने सोमवारपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद राहणार आहेत. त्यामुळे मुदतवाढीची घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे.यंदा अपेक्षेपेक्षा जास्त तुरीचे उत्पादन झाल्याने बाजारपेठेत तुरीची आवक वाढली. परिणामी, दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी शासनाने जिल्ह्यात १५ डिसेंबरपासून ९ हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी वारंवार बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने महिन्यातून किमान तीन-चार वेळा टाळे लागत होते. सुरुवातीस १५ मार्चपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू राहणार होते. परंतु, होणारी आवक पाहता त्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र प्रत्यक्षात केंद्रावर बारदाण्याचा तुटवडा असल्याने तुरीचा मापतोल करण्यास चार-चार दिवसांचा विलंब लागत होता. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते. गुरुवारी अचानकपणे १५ एप्रिलपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद करण्याचे नाफेडने आदेश दिले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान, राज्य शासनाकडून आठवडाभर मुदतवाढीची घोषणा झाली. पण प्रत्यक्षात लेखी आदेश नाफेडच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले नाहीत. याउलट खरेदी केंद्रावर असलेल्या सर्व तुरीचे मापतोल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे ज्या केंद्रांवर मापतोल झाला आहे, तेथील केंद्र बंद झाले आहे. (प्रतिनिधी)