शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

‘जीएमआयआरडीआर’ सुरू करण्याचा निर्णय

By admin | Updated: December 23, 2014 00:35 IST

औरंगाबाद : गोपीनाथ मुंडे यांच्या नावे विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवरील ग्रामविकास संशोधन संस्था

औरंगाबाद : गोपीनाथ मुंडे यांच्या नावे विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवरील ग्रामविकास संशोधन संस्था (जीएमआयआरडीआर) सुरू करण्याचा निर्णय सोमवारी रत्नागिरी येथे झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. काही दिवसांपूर्वी अधिसभा सदस्य प्रा. गजानन सानप यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावे विद्यापीठाने ग्रामविकास संशोधन संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव कुलगुरुंना दिला होता. आजच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर कुलगुरु डॉ. चोपडे यांनी ऐनवेळचा विषय बैठकीसमोर मांडला. मराठवाड्याचे सुपुत्र तथा दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवरील ग्रामविकास संशोधन संस्था सुरू करावी, असा तो विषय होता. तेव्हा बैठकीतील उपस्थित सर्व सदस्यांनी या विषयास एकमताने मंजुरी दिली. गोपीनाथ मुंडे यांच्या नावे सुरू केल्या जाणारी ही संस्था कशी असावी, तिचे कार्य व अभ्यासक्रम कसे असावे, यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर या संस्थेला शासनाची मान्यता मिळविण्यासाठी डॉ. शिवाजी मदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शिवाय बैठकीसमोर विद्यापीठात सध्या ‘बॅचलर आॅफ व्होकेशनल कोर्स’ सुरू आहे. त्याअंतर्गत पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘हॉटेल मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग’ हा कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारचा कोर्स संपूर्ण राज्यात कुठेही नाही, हे विशेष!बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्य उल्हास उढाण यांनी मराठवाड्यातील दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता विद्यापीठातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये ‘एनएसएस’च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे समुपदेशन केले जावे, हा ठराव मांडला. रत्नागिरी येथील विद्यापीठाच्या सेंटर फॉर मरिन रिसर्च या उपकेंद्रासाठी सहायक प्राध्यापकांच्या ६, तंत्र सहायक व संशोधन सहायकाची प्रत्येकी एक याप्रमाणे २ अशा एकूण ८ जागा भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या उपकेंद्राला शासनाने ३ एकर जागा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे पदसिद्ध सचिव कुलसचिव डॉ. धनराज माने, कायम निमंत्रित परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, सदस्य डॉ. शिवाजी मदन, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. वसंत सानप, डॉ. दत्तात्रय आघाव, संजय निंबाळकर उपस्थित होते.४शासनाने दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे; पण त्यासंदर्भात आतापर्यंत विद्यापीठाला लेखी स्वरूपातील मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत. ४याबद्दल शासनाने कोणते पाऊल उचलले आहे, ते जाणून घेऊन विद्यापीठातील संपूर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचा निर्णय घेतला जाईल, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी उल्हास उढाण यांच्या विषयावर भूमिका स्पष्ट केली.