राज्य शासनाच्या सूचनेनुसार शहरातदेखील हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणे गरजेचे आहेच. मात्र, त्यापेक्षा जीव महत्त्वाचा आहे आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक विद्यार्थ्याच्या जिवाचे रक्षण करणे हे प्रथम कर्तव्य आहे. ३ जानेवारी रोजी शाळा सुरू करण्यासंदर्भात पाण्डेय यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे व याबाबत सर्व पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन घोडेले यांनी केले आहे.
शाळा उशिरा उघडण्यासंदर्भातील निर्णय योग्यच
By | Updated: November 22, 2020 09:02 IST