शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक

By admin | Updated: January 16, 2017 00:55 IST

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

लातूर : काळ्या पैशाला धक्का दिला पाहिजे, अशी चर्चा दर चार वर्षांनी केली जायची. पण हे शिव-भीमधनुष्य पेलण्याची ताकद केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविली. पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपत्कालीन गैरसोय होईल, पण दीर्घकालीन उपयुक्त आहे, असे मत अर्थतज्ज्ञ खा.डॉ. नरेंद्र जाधव यांनी येथे रविवारी व्यक्त केले. श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने एसएमआर स्वीमिंग पूल येथे ‘विमुद्रीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार होते. मंचावर संस्थेचे मार्गदर्शक अजय ठक्कर, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, धर्मराज हल्लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था वेगवान होती. विकासाचा दर ७.५ टक्के होता. याचा अर्थ सर्वकाही अलबेल आहे, असा होत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. ज्या प्रमाणे रोजगार निर्मिती व्हायला हवी होती, ती झाली नाही. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गैरसोयींबाबत चर्चा झाली. मात्र दीर्घकालीन उपयुक्ततेबद्दल बोलले जात नाही. गैरसोयीचा गैरसमज वाढवून सांगितला. पण उपयुक्तता सांगितली नाही, अशी खंतही डॉ. जाधव यांनी व्यक्त केली. या निर्णयामागे बनावट नोटा व काळ्या पैशाला दणका देणे हा हेतू आहे. बनावट नोटांचा उपयोग करून दहशतवाद्यांनी आतापर्यंत ३५ हजार भारतीयांचा बळी घेतला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार बळींची संख्या अत्यंत नगण्य आहे, म्हणून तुम्ही समर्थन करणार का? असा सवालही खा.डॉ. जाधव यांनी उपस्थित केला. सूत्रसंचालन डॉ. गणेश बेळंबे यांनी केले, तर संस्थेचे अध्यक्ष हणमंत जगताप यांनी आभार मानले.