शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह घरात सोडून मायलेकी पळाल्या

By admin | Updated: March 1, 2017 01:16 IST

विडा : केज तालुक्यातील विडा येथील नारायण भिवाजी दुनघव वय (५५) या मजुराचा सोमवारी रात्री गूढ मृत्यू झाला.

विडा : केज तालुक्यातील विडा येथील नारायण भिवाजी दुनघव वय (५५) या मजुराचा सोमवारी रात्री गूढ मृत्यू झाला. मंगळवारी मयताची पत्नी तीन मुलींसह गायब झाल्याने हे प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे.नारायण दुनघव हे पत्नी राजूबाईसमवेत विडा येथे वास्तव्यास आहेत. त्यांना तीन मुली असून एकीचे लग्न झालेले आहे; पण ती नांदत नाही. उर्वरित दोघी अनुक्रमे १७ व १४ वयाच्या आहेत. विवाहित मुलगी माहेरीच राहते. मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबातील नारायण दुनघव यांचा सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. मात्र, पत्नी राजूबाई व त्याच्या तिन्ही मुलींनी ही बाब कोणालाही सांगितली नाही.मंगळवारी सकाळी दहा वाजता नारायण दुनघव यांचा मृतदेह घरातच ठेवून या राजूबाई तिन्ही मुलींसह गायब झाली. दरम्यान, शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर केज ठाण्याचे फौजदार अनंत वाठोरे, जमादार मंगेश भोले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी विडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. मयत नारायण यांच्या अंगावर कुठलेही व्रण नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे गूढ कायम आहे. पप्पू कान्होबा दुनघव यांच्या खबरीवरुन केज ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार अंनद वाठोरे करत आहेत. (वार्ताहर)