शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी धोरणात्मक विषय

By admin | Updated: April 2, 2017 00:28 IST

जालना : कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री कोणते मुहूर्त शोधत आहेत, असा सवाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी येथे केला.

जालना : मुख्यमंत्री सांगतात धोरणात्मक विषयांवरच बोला. मग शेतकरी कर्जमाफी हा धोरणात्मकच विषय असून, शेतकऱ्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. ९ हजार शेतकरी आत्महत्या झालेल्या असतानाही कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री कोणते मुहूर्त शोधत आहेत, असा सवाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी येथे केला.चंद्रपूर येथून सुरु झालेल्या प्रमुख विरोधी पक्षांची शेतकरी कर्जमुक्तीसाठी संघर्ष यात्रा शनिवारी जालन्यात पोहोचली. यानिमित्त मातोश्री लॉन येथे आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजीमंत्री डॉ.पतंगराव कदम, राजेश टोपे, आरेफ नसीम खान, जयदत्त क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आदी उपस्थित होते.विखे म्हणाले की, राज्यात तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. मात्र केंद्राच्या कृषीमंत्र्यांना राज्याचा दौरा करण्यासाठी वेळ नाही. विरोधी पक्षांच्या सर्व आमदारांचे निलंबन झाले तरी चालेल, परंतु कर्जमाफीची मागणी लावून धरणार. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना वेगळा आणि महाराष्ट्रात वेगळा न्याय हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. १ एप्रिल म्हणजे फेकू दिन. केवळ फेकाफेकी करणारेच मोदी सरकार असून, आश्वासनांची पूर्तता करण्यात येत नसल्याचा आरोपही विखे यांनी यावेळी केला. राज्यात दुष्काळ नाही, असे म्हणून शेतकऱ्यांचा अपमान करु नका. शेतकऱ्यांना मदत करु नका, पण खोटे बोलू नका, अशी टीका विखे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता केली. शेतकऱ्यांच्या प्रती शिवसेना प्रामाणिक असेल तर सरकारमधून बाहेर पडून संघर्ष यात्रेत सामील व्हावे, असे आवाहनही त्यांनी शिवसेनेला केले. माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सभागृहात १९ आमदारांचे निलंबन म्हणजे, सरकार टिकविण्यासाठी भाजपाने लोकशाहीचा खून पाडल्याचा प्रकार आहे. सत्तेसाठी हापापलेले हे लोक असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. सिडको, म्हाडा आदी महामंडळांकडे जवळपास १ लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. राज्य सरकारने या ठेवीतून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.आ. टोपे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतीचे प्रश्न प्रलंबीत असून, ते सोडविण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवून कर्जमाफीसह शेत मालाला आधारभूत किंमत देण्यासह इतर मागण्या मान्य करुन घेण्यात येतील. अबू आझमी यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने तात्काळ सोडवावेत, अशी मागणी केली. जालना येथे मातोश्री लॉनवर शेतकरी संघर्ष यात्रेच्या आगमनानंतर झालेल्या सभेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)