शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पोलिस-भाजप कार्यकर्त्यांत वाद

By admin | Updated: July 10, 2014 01:02 IST

लातूर : परवाच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या शैलेश लाहोटी यांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून बुधवारी पोलिस व भाजप कार्यकर्त्यांत वाद झाला.

लातूर : परवाच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या शैलेश लाहोटी यांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून बुधवारी पोलिस व भाजप कार्यकर्त्यांत वाद झाला. या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपवासी झालेल्या शैलेश लाहोटी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभरात भाजप कार्यकर्त्यांकडून बुधवारी बॅनर्स लावण्यात येत होते. त्यापैकीच काही बॅनर्स लातुरातील हनुमान चौकातही लावण्यात आले. परंतु, रहदारीला अडथळा होत असल्याचा दावा करीत गांधी चौक पोलिसांनी होमगार्डच्या मदतीने बॅनर काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब समजताच भाजपाचे मोहन माने, अभिमन्यू हिरास, बालाजी सुतार, भाऊसाहेब गलांडे यांच्यासह इतर तीन-चार कार्यकर्ते हनुमान चौकात जमले. त्यानंतर पोलिस व भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये बॅनरवरून वाद झाला. त्यामुळे पोलिसांनी उपरोक्त पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सार्वजनिक शांततेचा भंग करीत जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कलम १३५ बीपी अ‍ॅक्टनुसार गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांचे पोलिसांवर आरोप... मोहन माने यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून पोलिसांवर आरोप केले. बॅनर काढण्याचे काम मनपाचे असताना पोलिस कोणाच्या सांगण्यावरून बॅनर काढत होते. तसेच चोर-दरोडेखोरांप्रमाणे आम्हाला मारहाण करीत फरफटत नेण्याचा किळसवाणा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी केला, असा सवालही माने यांनी केला आहे. सकाळी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने शिवाजी चौकापासून बॅनर काढणे सुरू केले होते. त्यांनी हनुमान चौकातील भाजपचे बॅनर काढल्यानंतर त्यांच्याशी कार्यकर्त्यांनी वाद घातला. त्यामुळे काढलेले बॅनर तसेच टाकून मनपाचे पथक परतले. रस्त्यावर पडलेले बॅनर घडी घालताना पोलिस दिसल्याने नंतर आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनीच बॅनर हटविल्याचा आरोप केला आहे. त्यांनी एकत्र जमून घोषणाबाजी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोनि. बालाजी सोनटक्के यांनी दिली.