वाळूज महानगर : आठ दिवसांपूर्वी वाळूज औद्योगिक वसाहतीत कौटुंबिक कारणावरून मेव्हणा व त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला गणेश आझाद दुगलज (२५, रा. रेणुकानगर, रांजणगाव शेणपुंजी) या तरुणाचा घाटीत उपचार सुरू असताना रविवारी रात्री अखेर मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस आरोपींना अभय देत असल्याचा आरोप करीत घाटीत चांगलाच गोंधळ घातला. प्रेत ताब्यात घेण्यात नकार दिला. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घालीत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सोमवारी दुपारी नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतले. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, रांजणगाव शेणपुंजी येथील गणेश दुगलज याचे कुटुंब व पंढरपुरातील चंडालिया या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरूआहे. विशेष म्हणजे दुगलज कुटुंबातील दोन मुलींचे लग्न चंडालिया कुटुंबियात करण्यात आले आहे आणि या दोन्ही मुलींना चंडालिया कुटुंब नीट वागवत नव्हते. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांसोबत वारंवार खटके उडत होते. हेच या दोन्ही कुटुंबातील वादाचे मूळ होते.बहिणीला नीट वागवीत नाही म्हणून मयत गणेशचा भाऊ आतिश दुगलज याने चंडालिया कुटुंबियाला फोन करून ‘तुम्ही माझ्या बहिणींचे वाटोळे केले. आता तरी नीट वागा, त्यांना नीट वागवा’ असे बजावले होते. आतिशच्या या धमकीवजा सूचनेमुळे संतापलेला मेव्हणा नरेश चंडालिया याने त्याचे नातेवाईक सुनील चंडालिया, (पान २ वर)गणेश दुगलज याची मोठी बहीण आरती हिचा विवाह पंढरपुरातील नरेश चंडालियासोबत तर धाकटी सोनमचा विवाह सुनील चंडालिया याच्याशी झालेला आहे. या दोन्ही बहिणींचा सासरकडील मंडळी छळ करीत असल्यामुळे दुगलज कुटुंबियाचा चंडालिया कुटुंबाबरोबर वाद सुरूआहे. ४या दोन्ही बहिणींनी त्यांच्या सासरकडील मंडळी सतत शारीरिक, मानसिक छळ करीत असल्याच्या तक्रारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. दीड वर्षापूर्वी याच कारणावरून आतिश दुगलज, गणेश दुगलज यांनी आपला मेव्हणा सुनील चंडालिया याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ४या प्रकरणी सुनील चंडालिया यांच्या तक्रारीवरून दुगलज कुटुंबाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेच्या आदल्या दिवशी १ मे रोजी दुगलज कुटुंबियांनी पंढरपुरात जाऊन चंडालिया कुटुंबाशी वाद घातला होता.
मेव्हण्यांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: May 10, 2016 01:02 IST