आव्हाना : गेल्या चार दिवसांपासून डेंग्यू सदृश तापेने फणफणत असलेल्या लक्ष्मीबाई रंगनाथ सरोदे (५२) यांचे औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात शुक्रवारी रात्री नऊ वाजता निधन झाले.भोकरदन तालुक्यातल आव्हाना परिसरात गेल्या आठवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे तापेच्या रूग्णात वाढ झाली आहे. काही रूग्णांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत लक्ष्मीबाई यांना चार दिवसांपासून ताप होता. परंतु येथील रूग्णालयात उपचार सुरू असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना सकाळी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. अजून गावात तापेचे रूग्ण आढळून येत असल्याने याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली.
डेंग्यू सदृश तापेने महिलेचा मृत्यू
By admin | Updated: September 3, 2016 00:25 IST