शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वडगावात बेशुद्ध सापडलेल्या अनोळखी इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:05 IST

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी परिसरात बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ...

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी परिसरात बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मंगळवार (दि.१६) सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम बेशुद्धावस्थेत वडगाव परिसरात आढळून आला होता. १०८ रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. या अनोळखी इसमाला कोणी ओळखत असल्यास एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोना. आदमाने यांनी केले आहे.

---------------------

बजाजनगरातून तरुणी बेपत्ता

वाळूज महानगर : बजाजनगरातून एक २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ऋतुजा दशरथ मात्रे (२०, रा. बजाजनगर) या तरुणीचा १९ मार्चला रात्री आईसोबत किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर ऋतुजा ही घरातून निघून गेली आहे. याप्रकरणी दशरथ मात्रे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

--------------------

छोटा हत्ती रस्त्यावरील खांबाला धडकला

वाळूज महानगर : भरधाव छोटा हत्ती रस्त्यावरील खांबाला धडकल्यानंतर तो हातगाडीवर जाऊन आदळल्याची घटना आज बुधवारी (दि.१७) सिडको वाळूज महानगरात घडली.

सिडको वाळूज महानगरातून छोटा हत्ती (एमएच-२० सीटी-७६७६) हा भरधाव जात असताना सकाळी जिजामाता चौकातील एका महापुरुषाचे नाव असलेल्या खांबावर व नंतर लगतच्या हातगाडीवर जाऊन धडकला. सुदैवाने हातगाडीवर भाजीपाला विक्री करणारी महिला व तिचा मुलगा पाणी पिण्यासाठी लगतच्या हॉटेलमध्ये गेल्याने बचावले.

--------------------------