शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ रेणू’ च्या याही नवजात बछड्यांचा मृत्यू

By admin | Updated: September 12, 2016 23:23 IST

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील बिबट्या ‘रेणू’ने शनिवारी सकाळी दोन गोंडस बछड्यांना जन्म दिला होता.

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील बिबट्या ‘रेणू’ने शनिवारी सकाळी दोन गोंडस बछड्यांना जन्म दिला होता. अवघ्या ४८ तासांमध्ये दोन्ही बछड्यांचा मृत्यू झाला. बछड्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रयोगशाळेसह हैदराबाद येथील मोठ्या प्रयोगशाळेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रेणू’ने चौथ्या वेळेस बछड्यांना जन्म दिला. चारही वेळेस बछड्यांचा मृत्यू झाला. हेमलकसा येथे दोनदा अशी घटना घडली. मात्र, आमटे कुटुंबियांनी मनपाला ही बाब सांगितलीच नाही.१६ फेबु्रवारी २०१६ रोजी महापालिकेने गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथून रेणू आणि राजा या बिबट्याची जोडी आणली. रेणू गरोदर आहे, हेसुद्धा मनपाच्या डॉक्टरांना सांगण्यात आले नव्हते. हेमलकसा येथून आल्यापासून रेणू अस्वस्थ होती. महापालिकेच्या डॉक्टरांनी तिला गॅस्ट्रो झाला असेल म्हणून औषधोपचार सुरू केले. दरम्यान, ९ मार्च रोजी रेणूने अचानक तीन बछड्यांना जन्म दिला. अशक्त बछड्यांना जिवंत ठेवण्यासाठी मनपाने बरेच प्रयत्न केले. २४ तासांत दोन तर ४८ तासांत तिसऱ्या बछड्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. महापालिकेने या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करून तत्कालीन प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.दरम्यान, रेणू तीन महिन्यांनंतर पुन्हा गरोदर झाली. मनपातील तज्ज्ञ डॉ. खाजा इनामदार, प्रभारी संचालक विजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेणूची भरपूर काळजी घेणे सुरू केले. तिच्या औषधोपचारात कोणतीच कसर सोडली नाही. ९० दिवसांच्या गरोदरपणानंतर शनिवारी सकाळी १० वाजता रेणूने दोन गोंडस बछड्यांना जन्म दिला. या घटनेने पुन्हा एकदा सिद्धार्थ उद्यानात पाळणा हलला होता. जिकडे तिकडे आनंदी वातावरण पसरले होते. रेणूने बछड्यांना दूध पाजणेही सुरू ठेवले होते. मागील दोन दिवसांपासून रेणू बछड्यांसोबत मस्त खेळत होती. रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत रेणूचे दोन्ही बछडे अत्यंत ठणठणीत होते. पहाटे ४.३० वाजता दोन्ही बछड्यांनी माना टाकल्या होत्या. या घटनेने प्राणिसंग्रहालयात पहाटेच भूकंप आला. बछड्यांना बाहेर काढून पाहिले असता दोन्हीही मरण पावले होते.अनुवंशिक तथा गुणसूत्रांचा दोषऔरंगाबादेत आणण्यापूर्वी रेणूने हेमलकसा येथे असताना दोनदा बछड्यांना जन्म दिला होता. पहिल्यांदा रेणूने चार बछड्यांना जन्म दिला होता. दुसऱ्यांदा किती बछड्यांना जन्म दिला याची इत्थंभूत माहिती आमटे कुटुंबियांनी महापालिकेला दिली नाही. रेणूवर उपचार करणाऱ्या डॉ. इनामदार यांनी सांगितले की, रेणूमध्ये अनुवंशिक गंभीर आजार असण्याची शक्यता आहे. बछड्यांच्या जन्मानंतर ४८ तासांमध्ये ते मरत आहेत. चौथ्या वेळेस म्हणजे आता रेणूच्या पहिल्या बछड्याचे वजन ६०० ग्रॅम, दुसऱ्याचे ५०० ग्रॅम होते. त्यांच्या पचनशक्तीमध्ये गंभीर दोष निर्माण झाला. त्यांच्या अंगात ‘किटोन’च्या अंशाचे प्रमाण बरेच वाढले असावे, असे वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. रोग अन्वेषण प्रयोगशाळेची मदतदोन्ही बछड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी खडकेश्वर येथील सहायक आयुक्त जी. एन. पांडे, पशुधन विकास अधिकारी बी. व्ही. देशमुख, रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहायक आयुक्त चंदेल, प्रभारी संचालक विजय पाटील, डॉ. व्ही. टी. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. ए. नागापूरकर, वनपाल एस. आर. भांबळे, वनरक्षक प्रकाश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. शवविच्छेदनात अत्यावश्यक अवयव तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. स्थानिक प्रयोगशाळेचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. हैदराबाद येथील प्रयोगशाळेची मदतही घेण्यात येणार असल्याचे इनामदार यांनी नमूद केले.